अश्लील भाषेत विद्यार्थ्यांना शिवीगाळ:जिल्हा परिषद शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल, अधिकाऱ्यांकडून तातडीने निलंबन

2 hours ago 1
राज्यात महिलांच्या विरोधातील गुन्ह्यांमध्ये विशेषतः शाळेतील मुलींच्या विरोधातील गुन्हे दिवसेंदिवस वाढतच जात असल्याचे दिसत आहे. बदलापूर प्रकरण झाले, त्यानंतर पुणे येथील शाळा बस चालकाने 8 वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केले आणि आता मराठवड्यातील परभणीच्या मानवत येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचे उघडकीस आले आहे. मानवत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील शिक्षकाने आठवीच्या विद्यार्थ्यांना अश्लील भाषेचा वापर करत शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वर्गातील विद्यार्थिनींनी पोलिसांच्या जनजागृती कार्यक्रमात गुप्तपणे तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास केल्यानंतर ही घटना सत्य असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मुख्याध्यापकांच्या फिर्यादीवरून सदर शिक्षाच्या विरोधात मानवत पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या शिक्षकाला तातडीने सेवेतून देखील निलंबित करण्यात आले आहे. दत्ता होगे असे या निलंबित शिक्षकाचे नाव आहे. मानवत पोलिसांच्या निर्भया पथकाकडून विविध शाळांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यास सुरू केले आहे. याच अभियानाचा भाग म्हणून जिल्हा परिषद शाळेत गेले असताना आठवीच्या काही विद्यार्थिनींनी घडलेला प्रकार पोलिस कर्मचारी शकुंतला चांदीवाले आणि सय्यद फयाज यांना सांगितला. त्यानंतर निर्भया पथकाने तातडीने चौकशी करत या प्रकरणात कारवाई सुरू केली. आरोपी शिक्षक दत्ता होगे हे नेहमीच विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना अश्लील भाषेत बोलून मारहाण देखील करत असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. पोलिसांनी ही बाब मुख्याध्यापकांकडे कळवली असता मुख्याध्यापिका श्रीमती छाया उमाजी गायकवाड यांनी शिक्षक दत्ता होगे यांच्या विरोधात फिर्याद देत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीतीशा मातुर यांनी या शिक्षकांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article