विधानसभा निवडणूक:प्रकाशा येथील मतदान केंद्रावर अंध, अपंग, वयोवृद्धांसह रुग्ण मतदारांना स्काऊट-गाइडच्या विद्यार्थ्यांनी केली मदत

5 hours ago 2
राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी बुधवारी येथील सर्वोदय विद्या मंदिर शाळेतील स्काऊट आणि गाइड विद्यार्थ्यांनी गावातील अंध, दिव्यांग, रुग्ण व वयोवृद्ध मतदारांना व्हीलचेअरवर बसवून मतदान केंद्रात नेत राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवला. शाळेचे प्राचार्य शरद पाटील, उपमुख्याध्यापक डी.टी. चौधरी, पर्यवेक्षक भालचंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्काऊट शिक्षक नरेंद्र गुरव व गाईड शिक्षिका छाया पाटील यांच्या नेतृत्वात स्काऊट व गाइड विद्यार्थी-विद्यार्थ िनींनी सकाळी सात वाजता मतदानास प्रारंभ झाले तेव्हापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत अखंडपणे सेवा बजावली. प्रकाशा येथे नऊ बूथ होते. प्रत्येक बूथच्या ठिकाणी दोन स्काऊट आणि एक गाइड विद्यार्थिनीची नेमणूक होती. मतदानाला जे मतदार अंध, अपंग, वयोवृद्ध, तथा आजारी रुग्ण येत होते त्यांना व्हील चेअरवर बसवून थेट बूथपर्यंत नेण्याचे काम या विद्यार्थ्यांनी केले. त्यांच्यासोबत स्काऊट शिक्षक गुरव मदतीला होते. एवढेच नव्हे तर या स्काऊट आणि गाइडच्या विद्यार्थ्यांनी रांगेत उभे असणाऱ्या महिला मतदारांच्या मुलाबाळांना सांभाळणे, रांगेत उभे असणाऱ्या पाणी देणे आदी कामेही करून सर्व मतदारांची मने जिंकली प्रकाशा येथे मतदानासाठी अपंग मतदार यांना व्हीलचेअरवर बसून बूथ पर्यंत घेऊन जाताना स्काऊट आणि गाइड विद्यार्थी. सोबत शिक्षक.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article