विधानसभा निवडणूक:सीमावर्ती भागातील 36 तपासणी नाक्यांवर पोलिसांची करडी नजर, कर्नाटकलगताच्या नाक्यांवर 24 तास तपासणी

6 days ago 2
कर्नाटक लगत असणाऱ्या कोल्हापूर परिक्षेत्रातील ३६ तपासणी नाक्यांवर पोलिसांची करडी नजर असून, मतदानाच्या अगोदर ७२ तास लहान-मोठे सर्व रस्ते बंद करणार आहे, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारे यांनी ‘ दिव्य मराठी’शी बोलताना दिली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास त्यांनी मंगळवेढा तालुक्यातील कात्राळ येथे असणाऱ्या इंटिग्रेटेड मॅनेजमेंट च्या स्थिर सर्वेक्षण पथकाच्या (एस.एस.टी) तपासणी नाक्याला भेट देऊन पहाणी केली. यावेळी त्यांच्यासोबत पोलिस निरीक्षक महेश ढवाण ,पोलिस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे उपस्थित होते. फुलारी म्हणाले, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमा भागात असणाऱ्या तपासणी नाक्यांची कडक तपासणी करण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये बारा ठिकाणी तपासणी केली जात आहे, इंटिग्रेटेड तपासणी करण्यात येत असून, त्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क ,जीएसटी ,महसूल विभाग, पोलिस विभाग हे एकत्र येऊन २४ तास काम करत आहेत. आंतरराज्य वाहतुकीकडे लक्ष ठेवण्यासाठी २४ तास शस्त्रधारी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ,सीसीटीएनएस ऑनलाइन सुरू करण्यात आले आहे. कंट्रोल रूम तयार करण्यात आली आहे, बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. ,जिल्हा प्रशासनाकडून सर्व सोयी या ठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. वनविभागाचा देखील सांगली कोल्हापूर मध्ये समावेश करावा , अशा सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतील ३६ तपासणी नाके (चेक पोस्ट )कर्नाटकला लागून आहेत. त्यापैकी १५ कोल्हापूर ,९ सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात १२ आहेत.पोलिसांनी सतर्क राहून कारवाया सुरू केल्या आहेत, रोख रक्कम, दारू,गुटखा पोलिसांकडून जप्त करण्याची कारवाई केली जात आहे. दरम्यान फुलारे यांनी या चेक पोस्टवर उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांना बोलून त्यांच्याकडून ही अधिक माहिती जाणून घेतली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दल सतर्क आहे. कोणतीही संशयस्पद व्यक्ती दिसल्यास किंवा वाहन दिसल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी यांनी केले. मतदानाच्या ७२ तास अगोदर सर्व रस्ते बंद करणार मतदान पूर्वी ७२ तासांमध्ये बंदोबस्त कडक करण्यात येणार आहे. लहान-मोठे रस्ते बंद करण्यात येणार आहेत. बेळगाव ,विजयपूर आणि कलबुर्गी यांचे डीएसप , डीआयजी कलबुर्गी आणि आयजी बेळगाव यांच्याशी संपर्क झाला आहे, त्यांना कोल्हापूर परिक्षेत्रातील गुन्हेगारांची यादी व फरार आरोपींचे माहिती देण्यात आली आहे. त्यांचा शोध सुरू आहे, असे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article