विनेश फोगाटने जिंकली राजकारणाच्या मैदानावरील पहिली कुस्ती

2 hours ago 1

काँग्रेस उमेदवार कुस्तीपटू विनेश फोगाट यांनी जुलाना मतदारसंघातून विजय मिळवला.Pudhari Photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

08 Oct 2024, 2:06 pm

Updated on

08 Oct 2024, 2:06 pm

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यामध्ये काँग्रेस उमेदवार कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) यांनी जुलाना मतदारसंघातून विजय मिळवला. तर हिसार मतदार संघातून उद्योजिका सावित्री जिंदाल यांनी अपक्ष लढत विजयी पताका फडकवली. हरियाणा विधानसभेच्या निकालात या दोन राजकीय पटलावरील महिलांच्या विजयाची चर्चा देशभरात होत आहे.

विधानसभेच्या राजकीय पटलावर पात्र ठरल्या

कुस्तीपटू विनेश फोगाटने (Vinesh Phogat) हरियाणा विधानसभेत जुलाना मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला. भाजप उमेदवार योगेश बैरागी यांचा त्यांनी पराभव केला. सुरुवातीला मतमोजणीत विनेश फोगाट मागे होत्या. नंतरच्या फेऱ्यांमध्ये मात्र त्यांनी आघाडी कायम ठेवली. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या पॅरिस ऑलम्पिकमध्ये काहीशा जास्त वजनामुळे विनेश फोगाट कुस्तीच्या अंतिम फेरीपुर्वी अपात्र ठरल्या होत्या. सबंध देश सुवर्णपदकाची अपेक्षा करत असताना पदकापासुनच मुकावे लागले होते. विधानसभेच्या राजकीय पटलावर मात्र त्या पात्र ठरल्या आहेत आणि राजकीय वजन देखील या निमित्ताने वाढले आहे.

विनेश फोगाटने राजकीय कुस्तीच्या मैदानात लढणे पसंत गेले

हरियाणा विधानसभा निवडणुकीत चर्चेत असलेल्या चेहऱ्यांपैकी विनेश फोगाट (Vinesh Phogat) हा एक प्रमुख चेहरा होता. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विनेश फोगाटला काहीशा अतिरिक्त वजनामुळे ऑलिंपिकमधून अपात्र व्हावे लागले, यावर संबंध देशाने दुःख व्यक्त केले होते. त्यानंतर कुस्तीला रामराम ठोकत विनेश फोगाटने राजकीय कुस्तीच्या मैदानात लढणे पसंत गेले. काँग्रेस उमेदवार म्हणून जुलाना मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली.

विनेश फोगाटचे देशभरातून अभिनंदन

विनेश फोगाटने निवडणूक जिंकल्यानंतर देशभरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. ‘संपूर्ण देश आदिशक्तीचा उत्सव साजरा करत असताना बलाढ्य आव्हानांना, अन्यायाला पुरून उरलेल्या "स्त्री शक्ती"चा हा विजय सुखावणारा आहे.’ अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी विनेश फोगाटचे अभिनंदन केले आहे. तर कुस्तीपटू साक्षी मलिक, बजरंग पुनिया,अन्य खेळाडूंसह विविध क्षेत्रातील लोकांनी देखील विनेश फोगाटचे अभिनंदन केले आहे.

सावित्री जिंदाल यांनी अपक्ष निवडणूक लढली आणि जिंकली.

देशातील सर्वात श्रीमंत महिला असा लौकीक असलेल्या ओपी जिंदाल समुहाच्या प्रमुख सावित्री जिंदाल यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात विजयी पताका फडकावली. हिसार विधानसभा मतदारसंघातून सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसला धक्का देत अपक्ष सावित्री जिंदाल अपक्ष लढून जिंकल्या आहेत. काँग्रेसचे रामनिवास राडा दुसऱ्या आणि भाजपचे उमेदवार डॉ. कमल गुप्ता तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी सावित्री जिंदाल यांनी त्यांचे पुत्र नवीन जिंदाल यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला. नवीन जिंदाल यांनी कुरुक्षेत्र मधून भाजपच्या वतीने लोकसभा लढवली आणि जिंकली. त्यानंतर विधानसभेत सावित्री जिंदाल यांना पक्षाने उमेदवारी देऊ केली नाही. अखेर बंडाचा झेंडा फडकवत त्यांनी अपक्ष निवडणूक लढली आणि जिंकली.

सावित्री जिंदाल यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी

८४ वर्षीय सावित्री जिंदाल उद्योग क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या ओपी जिंदाल समूहाच्या प्रमुख आहेत. देशातील सर्वात श्रीमंत महिला म्हणूनही त्या प्रसिद्ध आहेत. उद्योग क्षेत्रात कार्यरत असताना गेल्या अनेक वर्षांपासून त्या राजकारणातही सक्रिय आहेत. यापूर्वी त्या काँग्रेस पक्षात होत्या. काँग्रेसमध्ये असतानाही त्यांनी हिसारचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांचे दिवंगत पती ओपी जिंदाल या मतदार संघातून तीन वेळा निवडून आले होते. दरम्यान, २०१३ मध्ये हुड्डा सरकारमध्ये त्या मंत्री देखील होत्या. त्यापुर्वी २००५ आणि २००९ ला त्यांनी विधानसभा निवडणूक जिंकली होती. २०१४ ला मात्र त्यांचा पराभव झाला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article