विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना पकडले कोंडीत:अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयात मॉडेल पार्लमेंट उपक्रम

2 hours ago 1
अकलूज विरोधी पक्षाच्या बाकावरूनही विद्यार्थ्यांनी शेतकरी आत्महत्या, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण, देशाचे संरक्षण, जीएसटी आणि सीमा प्रश्न विचारत विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले. सत्ताधाऱ्यांना उत्तरे देण्यास भाग पाडले पाडले. ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संसदीय अनुभव मिळाला. येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयात विद्यार्थ्यांना संसदीय कार्यप्रणालीची माहिती होण्याकरिता राज्यशास्त्र विभागाच्या वतीने गुरुवारी मॉडेल पार्लमेंट उपक्रम घेण्यात आला. महाविद्यालयातच झालेल्या या कार्यक्रमात सभापतीच्या निवडीपासून सुरुवात झाली. यानंतर राष्ट्रगीत गायन आणि सदस्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. प्रश्नोत्तराचा तास, शून्य प्रहर तसेच इतर महत्त्वाचे विषयांवर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांना संसदीय कार्यप्रणालीचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा आणि त्यांची विचारसरणी व्यापक लोकशाहीवादी व्हावी, हा मॉडेल पार्लमेंट उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये राजकीय, सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांवर सखोल विचार करण्याची क्षमता विकसित होते, असे मत राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. विश्वनाथ आवड यांनी व्यक्त केले. शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते-पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राचार्य शिवप्रसाद टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम घेण्यात आला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article