विर्सजन मिरवणूक अडवून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न:१० ते १२ जणांवर गुन्हा, पुण्यातील घटना

2 hours ago 1
गणेश विर्सजन मिरवणुकीत गुलटेकडी डायसप्लाॅट येथील नुराणी मस्जीद समाेरुन सॅलेसबरी पार्क मित्र मंडळाची गणेश विर्सजन मिरवणुक जात हाेती. त्यावेळी १० ते १२ जणांचा बेकायदेशीर जमाव जमवून त्यांनी नुरानी मस्जीद मध्ये नमाज पठाण सुरु असल्याचे सांगत गणेश विर्सजन मिरवणूक अडवून स्पीकरचा आवाज बंद करण्यास सांगितला. तसेच दाेन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी स्वारगेट पाेलिस ठाण्यात १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी मंगळवारी दिली. याबाबत स्वारगेट पाेलिस ठाण्यात पंकज बाेसचंद्र यादव (वय-२४,रा.गुलटेकडी,पुणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार आराेपी यासीन माेमीन , सलीम शेख व त्यांचे इतर १० ते १२ साथीदारांवर भान्यास १२६ (२), १८९ (२), २९९, ३००, ३५३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे सॅलेसबरी पार्क मित्र मंडळाची गणेश विर्सज मिरवणूक १७ सप्टेंबर राेजी रात्री साडेअकरा वाजता नुराणी मस्जीद समाेर आली हाेती. त्यावेळी सदर ठिकाणी आराेपी यांनी दहा ते बारा जणांचा बेकायदेशीर जमाव जमवला. नुरानी मस्जीद मध्ये नमाज पठण सुरु आहे, असे कारण देऊन तक्रारदार यांचे मंडळाची गणेश विर्सजन मिरवणूक अडवली. त्यानंतर स्पीकरचा आवाज बंद करण्यास सांगून, चालू गणेश विर्सजन मिरवणुकीत व्यत्यय आणून दंगा घडविण्याचे उद्देशाने दाेन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तक्रारदार यांना मस्जीद समाेरुन पुढे जाण्यास अन्यायाने प्रतिबंध केल्याने तक्रारदार यांचे धार्मिक भावना दुखावून तक्रारदार यांच्या धार्मिक श्रध्दांचा अपमान करुन दाेन समाजात एकाेपा टिकवण्यास बाधक ठरेल असे कृत्य केले. याबाबत पुढील तपास स्वारगेट पाेलिस स्टेशनचे पाेलिस उपनिरीक्षक अशाेक पाटील करत आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article