व्यसनाच्या अधीन गेला अन् बनला गुन्हेगार!

2 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

03 Oct 2024, 11:01 am

Updated on

03 Oct 2024, 11:01 am

एका देशी बारच्या बाहेरील सीसीटिव्हीमध्ये ऍलन क्लासचा टिशर्ट घातलेल्या व्यक्तीचा शोध पोलिसांना लागला. त्यानंतर पोलिसांनी सीसीटिव्हीच्या मदतीने त्या टिशर्ट घातलेल्या व्यक्तीच्या मागोवा घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर पोलिसांनी त्या टिशर्टधारी व्यक्तीसोबत अन्य दोन अनोळखी व्यक्ती दिसून आल्या.

धीरज राजू शर्मा, वय २७, राहणार पनवेल कोळीवाडा परिसर, धीरज मित्राच्या संगतीने व्यसनाच्या अधीन गेला आणि हेच व्यसन त्याला गुन्हेगारीच्या जगात घेऊन गेले. १६ सप्टेंबर रोजी चौरजने दारूच्या नशेत अज्ञात इसमाची दिवसाढवळ्या हत्या केली आणि त्या इसमाकडे असलेले ४५० रुपये रोख घेऊन तो फरार झाला होता. त्यादिवशी दुपारी पनवेल शहर पोलिस ठाण्याचा फोन खणखणला आणि पोलिसांची पळापळ सुरू झाली. पोलिसांना माहिती मिळाली की, पनवेल रेल्वे स्टेशनजवळील चर्चच्या बाजूस थोड्या अंतरावर असलेल्या एका पडीक गोडावूनमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह कुवलेल्या अवस्थेमध्ये दिसून येत आहे.

या मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल शहर पोलिसांनी ते निर्जळस्थळ गाठले आणि मृतदेह ताब्यात घेऊन, भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) प्रमाणे अज्ञात इसमाविरोधात गुन्ह्याची नोंद केली. मृतदेह कुजलेल्या अवस्थेमध्ये असल्याने मृतदेहाची ओळख पटवणे पनवेल शहर पोलिसांना कठीण जाऊ लागले होते आणि या खुनातील आरोपींना शोधणे पोलिसांना आव्हानात्मक बनले होते.

या गुन्ह्याचा तपास पनवेल शहर पोलिस करत होते; मात्र पनवेल शहर पोलिसांच्या हातात काहीच लागत नव्हते. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा कक्ष २ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गवळी यांच्याकडे गेल्यानंतर तपासला वेग मिळाला, तपासासाठी जवळपास १९ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे पथक नेमण्यात आले. या पथकात सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण फडतरे, मानसिंग पाटील, प्रताप देसाई, अजित कानगुडे, पोलिस उपनिरीक्षक अभयसिह शिंदे, पोलिस हवालदार प्रशांत काटकर, रमेश शिंदे, अनिल पाटील, तुकाराम सूर्यवंशी, मधुकर गडगे, रणजित पाटील, नीलेश पाटील कोच अन्य कर्मचाऱ्यांनी या खुनोच्या तपासाला सुरुवात केली. त्या वेळी पोलिस अधिकारी प्रवीण फडतरे आणि अन्य पोलिसांचे लक्ष मृतदेहाच्या अंगात असलेल्या टीशर्टकडे गेले आणि त्या टीशर्टची पाहणी केल्यानंतर पोलिसांना टीशर्टवरती एका खासगी क्लासचे नाव दिसून आले.

त्या क्लासच्या नावाचा पोलिसांनी शोध सुरू केला आणि पोलिस त्या ऍलन क्लासच्या पत्त्यावर जाऊन धडकले. त्या क्लासमध्ये अधिक विचारपूस केल्यानंतर पोलिसांना त्या व्यक्तीची काही माहिती मिळाली नाही, मात्र या व्यक्तीला आम्ही काही दिवसांपूर्वी आमच्या क्लासच्या बाहेर फिरताना बघितल्याचे क्लास कर्मचान्यांनी सांगितल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीचा आधार घेत त्या व्यक्तीची ओळख पटवण्याचा शोध सुरू केला आणि त्यासाठी पनवेल रेल्वे स्टेशन, पनवेल एसटी स्टैंड, नवनाथनगर, चर्च परिसरातील जवळपास १०० हून अधिक सीसीटीव्ही पोलिसांनी तपासण्यास सुरुवात केली. नंतर मात्र एका देशी बारव्या बाहेरील सीसीटीव्हीमध्ये ऍलन क्लासचा टीशर्ट मातलेल्या व्यक्तीचा शोध पोलिसांना लागला.

त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने त्या टीशर्ट घातलेल्या व्यक्तीचा मागोवा घेण्यास सुरुवात केल्यानंतर, पोलिसांना त्या टीशर्टधारी व्यक्तीसोबत अन्य दोन अनोळखी व्यक्ती दिसून आल्या, त्यामध्ये एका व्यक्तीने खाकी कलरची पॅण्ट घातलेली पोलिसांना दिसून आली आणि त्याचवेळी खाकी पॅन्ट घातलेल्या इसमाचा पोलिसांनी शोध सुरू केला.

तो इसम महानगरपालिका, परिवहन सेवेत कामाला असेल असा अंदाज बांधून इसमाचा शोध घेण्यास सुरवात केली आणि पनवेल महानगरपालिका, तसेच परिवहन कार्यालयात जाऊन त्या व्यक्तीचा शोध घेतल्यानंतर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, संशयित खाकी पंष्टवाल्याला ताब्यात घेतले आणि त्याची अधिक विचारपूस केल्यानंतर तिसऱ्या व्यक्तीपर्यंत पोचणे पोलिसांना शक्य झाले. आणि तो तिसरा व्यवतीच हत्येकरू असल्याचे पोलिस तपासात समोर आले.

तिसरा व्यक्ती हा धीरज शर्मा असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर, पोलिसांनी धीरजचा शोध घेण्यास सुरुवात केली; मात्र धीरजचा पत्ता माहीत नसल्याने पुन्हा अडचणी समोर उभ्या राहिल्या. पुन्हा शोध सुरू झाला; मात्र धीरज हा देशी दारू पिण्यासाठी पनवेलमधील देशी बारमध्ये वारंवार येत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती, त्यानुसार पोलिसांनी २३ सप्टेंबर रोजी पहाटेपासून पनवेलमधील देशीबारचा परिसर पिंजण्यास सुरुवात केली.

त्याच दिवशी कोळीवाडा येथील एका देशी बारच्या बाहेर झोपलेल्या अवस्थेमध्ये भीरज शर्मा पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी त्याला कोल्यैवाडा येथून ताब्यात घेतले व सापडलेल्या मृतदेहाबद्दल त्याच्याकडे चौकशी केली. तेव्हा, मी या व्यक्तीचा खून केल्याची कबुली त्याने पोलिसांसमोर दिली, 'त्याचा खून का केला? याची विचारणा पोलिसांनी केली. त्यानंतर खुनोचे कारण सांगण्यास त्याने सुरुवात केली.

तो अवज्ञात इसम मला पुरी भाजी खायला घेऊन गेला. त्या वेळी आम्ही दारू पिलो होतो. पुरी भाजी खाल्ल्यानंतर विल कोण भरणार यावरून आमच्यात किरकोळ बाद झाला. त्यानंतर मी तुला दारू पाजतो, तू माझ्यासोबत चल, असे बोलून पनवेलमधील रेल्वे ट्रकजवळ असलेल्या वर्चख्या मागील बाजूस एका मोकळ्या, पडक्या गोडावूनमध्ये त्याला घेऊन गेलो आणि त्याच ठिकाणी पडलेल्या एका कापडी बेल्टने त्याचा गळा आवळून त्याचा खून केला, अशी कबुली त्याने पोलिसांकडे दिली. नंतर त्याच्या खिशातील साडेचारशे रुपयेदेखील घेतल्याचे त्याने सांगितले.

आरोपी निघाला भुरटा चोर

पोलिसांनी खूनप्रकरणी अटक केलेला आरोपी धौरव शर्मा हा चक्क सराईत भुरटा चोर निघाला. दारूच्या दुकानात दारू पिणाऱ्या अनोळखी व्यक्तीसोबत ओळख करायची, त्यांना दारू पाजायची, दारू पाजून त्या व्यक्तीना अज्ञातस्थळी मेऊन जायचे आणि त्याच्या मोबाईल आणि खिशातील रोख रकमेवर डल्ला मारायचा आणि पोबारा करायचा, ही त्याची चोरी करण्याची पद्धत होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article