'व्होट जिहाद'वर देवेंद्र फडणवीसांचा संताप:आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप; नोमणी यांच्या आवाहनाला सडेतोड उत्तर देण्याचा इशारा
2 hours ago
1
काँग्रेस जाती जातीमध्ये लोकांना विभाजित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमंशी बोलताना शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासह राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. सज्जात नोमाणी हे उलीमा कौन्सिलचे प्रमुख आहेत. त्यांनी त्यांच्या सतरा मागण्या महाविकास आघाडीकडे दिल्या आहेत. त्या मागण्या अतिशय भयानक असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मुस्लिमांना 10 टक्के आरक्षण द्या, 2012 ते 2024 महाराष्ट्र जेवढे दंगे झाले त्या दंग्यांमधील मुस्लिम समाजातील आरोपींवरील केसेस परत घ्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला, अशा प्रकारच्या मागण्या त्यांनी केल्या आहेत. तर महाविकास आघाडीतील पक्षांनी या मागण्या मान्य करणार असल्याचे पत्र नोमाणी यांना दिले आहे. आणि त्याच मागण्या मान्य झाल्याने आता नोमाणी हे शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि राहुल गांधी हे आमचे सेनापती असल्याचे सांगत आहेत. तसेच ते नागरिकांना व्होट जिहाद करण्याचे आवाहन करत आहे. निवडणुकीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात लांगुलचालन देशाच्या इतिहासात आम्ही पाहिले नव्हते. केवळ अल्पसंख्यांक समाजाची मते मिळवण्यासाठी या ठिकाणी विरोधी पक्ष, महाविकास आघाडी काम करत असेल तर त्या विरोधात निश्चितपणे आपल्या सर्वांना एक व्हावेच लागेल, असे देखील फडणवीस यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीला इशारा या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला इशारा देखील दिला. 'तुम्हाला वाटत असेल की मुठभर लोकांच्या मतांवर तुम्ही निवडून येऊ शकतात, तर बहुसंख्य मतांना देखील एकत्र यावेच लागेल. आज नोमणी यांचा दुसरा व्हिडिओ आला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मतदान केलेल्या मुस्लिमांना शोधून, त्यांना वाळीत टाकण्याचे आवाहन केले आहे. त्यांचे दाणा पण बंद करण्याचे आवाहन केले आहे. मात्र कायम धर्मनिरपेक्षाची भाषा करणारे त्याबद्दल काहीही बोलत नाहीत. या विरोधात आम्ही निश्चितपणे उत्तर देणार असल्याचा इशारा देखील फडणवीस यांनी दिला आहे. इतकेच नाही तर एका पद्धतीने हा एक गुन्हा आहे. किरीट सोमय्या यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील केली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. आघाडीकडे मुद्दाच नाही काँग्रेस जनतेला जाती जातीमध्ये विभाजित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर महाविकास आघाडी मुस्लिम समाजामध्ये पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांच्याकडे निवडणुकीसाठी मुद्दा उरला नाही. त्यांच्याकडे मुद्दाच नसल्याने केवळ जातीवाद करून व्होट जिहाद करण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नोमाणी यांनी मुस्लिम समाजाला केलेले आवाहन देखील पहा.... फडणवीसांनी दिला 'एक है...' चा नारा ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांच्या व्हिडिओवरून भाजप आक्रमक झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडकवासला येथील प्रचारसभेत नोमानी यांचा व्हिडिओ ऐकवत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. देशाला अस्थिर करण्याचे काम सुरू असून महाविकास आघाडी त्यांच्यासोबत सामील झाल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. आता एक राहिलो तरच सेफ राहू असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी सभेमध्ये एक है तो सेफ है...चा नारा दिला. पूर्ण बातमी वाचा... शेलार यांनीही केली होती टीका यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून देण्यात आलेल्या काही घोषणा आणि मुस्लिम मौलवींच्या वक्तव्यावरुन मतदारांना धार्मिकतेच्या आधारावर मतदान करण्याचे आवाहन केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 269 उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रच नाही, तर दिल्ली सरकारही निशाण्यावर असल्याचे सांगणारा सज्जाद नोमानी यांचा एका व्हिडिओ आशिष शेलार यांनी समोर आणला आहे. पूर्ण बातमी वाचा... महाविकास आघाडीला नोमाणींचा पाठिंबा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने महाविकास आघाडीला पाठींबा जाहीर केला आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली होती. मविआच्या 269 उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे. याशिवाय बोर्ड वंचित, एमआयएम, सपा, बविआसह अपक्ष उमेदवारांनादेखील पाठींबा देणार आहे. संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा देत असल्याची घोषणा सज्जाद नोमानी केली होती. पूर्ण बातमी वाचा...
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)