Devendra Fadnavis Eknath Shinde Ajit Pawar Look For Swearing successful Ceremony : उद्या महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे. या शपथविधी सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित असणार आहेत. या विशेष कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा खास लूक असणार आहे.
अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसImage Credit source: Facebook
मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी उद्या पार पडणार आहे. आझाद मैदानावर या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या लूककडेही विशेष लक्ष असणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडे खास तुकाराम महाराज केशर पगडी तयार करण्यात आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार गुलाबी फेटे देखील तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यात गुलाबी रंग देखील दिसणार आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. आता उद्या (5 डिसेंबर) मुंबईतील आझाद मैदानावर महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध राज्यातील मुख्यमंत्री उद्याच्या शपथविधी उपस्थित राहणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक असताना पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, शिवसेना शिंदे गटातील नेत्यांसाठी खास तुकाराम केशर पगडी बनविण्यात आल्या आहेत.