शहरातील हॉटेल, लॉजची तपासणी:ग्रामीण पोलिसांची कारवाई; 87 लाखांची बॅग लंपास, शोधासाठी 5 पथके

3 days ago 3
अमरावतीहून तब्बल ८७ लाख रुपये घेऊन पुणे जाणाऱ्या एका कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याची बॅग अज्ञात चोरट्यांनी पळवली आहे. तीन दिवसांनंतरही या चोरट्यांचा शोध लागला नाही. दरम्यान सोमवारी (दि. १४) ग्रामीण पोलिसांनी याच प्रकरणात शहरातील बहुतांश हॉटेल, लॉजची तपासणी करुन चोरट्यांबाबत काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. अमरावतीहून खासगी बसने पुण्यासाठी निघालेला कुरिअर कंपनीचा कर्मचारी ८७ लाख रुपये असलेली बॅग सोडून लघुशंकेसाठी बसखाली उतरला होता. त्याच दरम्यान चोरट्यांनी त्याची बॅग पळवली आहे. हा कर्मचारी मागील १२ वर्षांपासून संबंधित कुरिअर कंपनीत कामाला असून, यापूर्वी अनेकदा त्याने अशाच प्रकारे रोख घेऊन प्रवास केला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान हे चोरटे मागील काही दिवसांपासून त्या कर्मचाऱ्यावर पाळत ठेवून असावेत, तसेच घटनेच्या दिवशी त्यांनी कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याचा पाठलाग केला. कारण चोरटे आणि कुरिअर कर्मचारी वेलकम पॉइंटवरून खासगी बसमध्ये बसल्याचे पोलिस तपासात समोर आले. त्यामुळे ते चोरटे किंवा त्यांची टोळी मागील काही दिवस शहरात वास्तव्याला असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी शहरातील बहुतांश हॉटेल व लॉजची तपासणी केली. तसेच पोलिसांचा तांत्रिक तपास, त्यामुळे बॅग उडवणारे चोरटे पोलिसांच्या लवकरच जाळ्यात येण्याची शक्यता आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article