शहरी भागाची भक्कम साथ, सोपलांचा विजय साकार:बार्शीच्या ग्रामीण भागात राऊतांचेच वर्चस्व, पण मताधिक्य घेण्यात अपयश‎

1 hour ago 1
वैराग विधानसभा निवडणुकीत नेहमीप्रमाणे दिलीप सोपल विरुद्ध आमदार राजेंद्र राऊत या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यात चुरशीची लढत झाली. यात दिलीप सोपल हे विजयी झाले. यात नेहमीप्रमाणे बार्शी शहराने व वैराग शहराने त्यांना साथ देत विजयात निर्णायक हातभार लावला. तर राजेंद्र राऊत यांना त्यांच्या हक्काच्या ग्रामीण भागातील गावांनी मते देताना मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा हात आखडता घेतला. त्यामुळे राऊत यांना पराभव स्वीकारावा लागला. तर सोपल यांना पुरागमन करणे शक्य झाले. १९९९ पासून या दोघात कांटे की टक्कर होत आहे, तशीच लढत यंदाही झाली. मागील विधानसभा निवडणुकीत भूमकर आणि रोडरोलरची मते सोडली तर ३ हजार ७६ मतांनी राजेंद्र राऊत विजयी झाले होते. यंदा थेट दुरंगी लढत झाली. त्याचाही फायदा सोपल यांना झाला. बार्शी शहरात ७६ हजार मतदान झाले होते. शहरातील ९२ बूथमध्ये केवळ १७ बूथवर राऊत यांना आघाडी मिळाली. उर्वरित ७५ बूथवर दिलीप सोपल यांना तब्बल ७५६५५ मतांची आघाडी मिळाली. बार्शी शहराप्रमाणेच वैरागचे मकरंद निंबाळकर ,अरुण सावंत ,समाधान पवार यांनी वैराग ग्रामीण व शहरी भाग पिंजून काढला निरंजन भूमकर यांनी महाविकास आघाडीला साथ देण्याच्या निर्णय घेतला त्यामुळे सोपल यांना फायदा तर राऊत यांना फटका बसला. वैराग भागातील तीन जिल्हा परिषद गट येतात. जिल्हा परिषद मालवंडी गण व उपळे ( दु) गणामध्ये राऊत यांना आघाडी मिळाली तर शेळगाव गणामध्ये सोपल गटाची आघाडी राहिली . वैरागमधील सर्व १५ बूथवर सोपल यांना आघाडी मिळाली. वैराग शहरात दिलीप सोपल यांना राऊत यांच्यापेक्षा २१६२ मते जास्त मिळाली. आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष निंबाळकर , नगरसेवक शाहुराजे निंबाळकर , नगरसेवक वैजिनाथ आदमाने, मेजर जगन्नाथ आदमाने यांनी देखील राऊतासाठी प्रयत्न केले. वैराग ग्रामीण भाग हा गेल्या काही निवडणुकांपासून राऊत यांना साथ देत आहे. मागील निवडणुकीच्या वेळी वैरागसह १४० गावातून तब्बल १० हजारांचे लीड त्यांना भागाने दिले होते. यंदा मात्र त्यांची आघाडी तब्बल ९ हजाराने कमी झाली. राजेंद्र राऊतांना केवळ वैराग ग्रामीण भागातून केवळ १०६७ मतांचे लीड मिळाले. आणि इथेच सोपल यांचा खऱ्या अर्थाने विजय झाला. ग्रामीणचा मतदार राऊतांच्या बाजून राहीला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article