शामराव बोधनकर, इंद्रायणी बोधनकर स्मृती पुरस्कार जाहीर:21 नोव्हेंबरला छत्रपती संभाजीनगर येथे होणार वितरण
6 days ago
2
स्वातंत्र्य सैनिक शामराव बोधनकर स्मृती पुरस्कार आणि समाजसेवी कै इंद्रायणी मधुकर बोधनकर स्मृती पुरस्कार 2024, डॉ रवींद्र कोल्हे आणि डॉ स्मिता रवींद्र कोल्हे यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार प्रदान सोहळा गोविंद भाई श्रॉफ ललित कला अकादमी सभागृह सरस्वती भुवन परिसर छत्रपती संभाजीनगर येथे 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. पुरस्काराचे मानकरी डॉ रवींद्र कोल्हे व डॉ स्मिता रवींद्र कोल्हे या दोघांनाही भारत शासनातर्फे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या अतिशय कमी अशा जोडप्यांमधील एक असलेल्या या दांपत्याला इतरही अनेक सन्मान प्राप्त झालेले आहेत. वैरागड या मेळघाटातील अतिशय दुर्गम भागात गेल्या चौतीस वर्षांपासून ते वैद्यकीय सेवा करीत आहेत .केवळ दोन रुपये फीस आकारणारे डॉक्टर म्हणून ते प्रसिद्ध आहेत .त्यांच्या सातत्यपूर्ण खडतर आणि अथक प्रवासात त्यांनी आदिवासींच्या उत्थापनासाठी असंख्य उपक्रम राबवले आहेत; ज्यामध्ये शेतीतील प्रयोग ,पशुपालन, शासकीय स्वस्त धान्य योजना इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या अतिशय कमी अशा जोडप्यांमधील एक असलेल्या या दांपत्याला प्रत्यक्ष ऐकण्याची संधी या कार्यक्रमात रसिकांना मिळणार आहे .पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजवादी नेते अंकुश भालेकर हे असतील. त ज्ञानप्रकाश मोदानी ज्येष्ठ गांधीवादी व पर्यावरणवादी विचारवंत हे अध्यक्ष असतील. याप्रसंगी 'अग्निशिखा कावेरी 'या हैदराबाद मुक्ति संग्रामावर आधारित बालनाट्याचे उर्दू भाषांतर आणि 'हैदराबाद मुक्ती संग्रामातील झुंजार महिला' या डॉ ऊर्मिला चाकूरकर यांच्या पुस्तकांचे विमोचन होणार आहे. या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी उपस्थित रहावे असे आव्हान डॉ प्र दि जोशी पाटोदेकर, राघवेंद्र चाकूरकर ,डॉ ऊर्मिला चाकूरकर, अभय बोधनकर, महेंद्र बोधनकर, जयदेव डोळे, डॉ भवान महाजन, आदींनी केली आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)