शाळांत कॅमेरे, आरोग्य केंद्रांमध्ये औषधे खरेदी:दहा कोटींच्या कामांना मंजुरी, आचारसंहितेपूर्वी कामांना मंजुरी, जिल्हा परिषदेने अनुभवली तारांबळ‎

2 days ago 2
निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे शहरातील व ग्रामीण भागातील डिजिटल काढण्यासाठी फ्लेक्स काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना २४ तासांत तर खासगी संस्था व कार्यालयावरील बोर्ड ४८ तासांत काढून घेण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते डिजिटल स्वतःहून काढून घेताना दिसले. शासकीय कार्यालयावरील डिजिटल फ्लेक्स हे अधिकारी कर्मचारी काढून घेत असताना दिसून आले. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर लगेचच याविषयी कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. तसेच शहरातील भिंतीवर राजकीय प्रतिनिधी | सोलापूर जिल्हा परिषद प्रशासानाने आचारसंहिता लागण्यापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी आैषध खरेदी, अंगणवाडी केंद्राची दुरुस्ती, नवीन वर्गखोल्या बांधकाम, सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यासह नागरी सुविधांच्या कामांना प्राधान्य देत सुमारे १० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या फायलींना मंजुरी दिली. आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने गेल्या आठवड्यापासून जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत जणू लगीनघाई होती. बांधकाम विभागात ठेकेदार विविध कामांचे बिल मंजुरीसाठी अक्षरश: हेलपाटे घालत होते. ग्रामपंचायत विभागामध्ये नागरी व जन सुविधांच्या कामांना मंजुरीची लगबग सुुरू होती. आचारसंहिता कालावधीत ग्रामीण भागातील नागरिकांना कोणत्याही अडचणी येऊ नये, यासाठी प्रशासनाने मागील काही दिवसांपासून कामाचे अचूक नियोजन केले होते, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सांगितले. २७७७ शाळांतील सीसीटीव्हीसाठी मिळाले ३ कोटी १० लाख जिल्ह्यातील २ हजार ७७७ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे ५५ कोटींची मागणी केली होती. पण, ३ कोटी १० लाखांचा निधी मिळाला. कॅमेरा बसविण्यासाठी निविदा प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आली. वाहने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू होती साखर कारखाने व इतर स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडे असणाऱ्या वाहनांचा ताबा निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे देण्यात आला असून, वाहने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू होती.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article