महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकांत महायुतीला अभूतपूर्व यश मिळालेले आहे.परंतू मुख्यमंत्री पदावरुन एकनाथ शिंदे अडून बसल्याने चार दिवस झाले तरी महाराष्ट्रात सरकार बनलेले नाही. आता भाजपाच्या खासदाराने एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा असे म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची सगळ्यांची भावना आहे. आमचा स्ट्राईक रेट जवळपास ९९ आहे. ज्याचा स्ट्राईक रेट जास्त त्यालाच संधी मिळाली पाहीजे असे भाजपाचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी म्हटले आहे. मागे 2019 ला लहान भावाला आम्ही सिंहासनावर बसवलं, आता एकनाथ शिंदे यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा असे आवाहन भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी केले आहे, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून आम्ही देवाला प्रार्थना करत आहोत असेही गोपछडे यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस अडचणीच्या काळात धावून जाणारे नेते आहेत, कोरोना असो वा कोणतेही संकट ते अडीअडचणीला धावून आलेले आहेत, त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री पदावर दावा असायला पाहीजे त्यांनाच हे पद दिले पाहीजे असेही गोपछडे यांनी म्हटले आहे.
Published on: Nov 27, 2024 02:45 PM