Published on
:
28 Nov 2024, 10:27 am
Updated on
:
28 Nov 2024, 10:27 am
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत राजकीय पदाधिकारी यांचे सर्कल असलेल्या शेवाळा सर्कल मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राजकीय वर्चस्व दाखवून देत आ. संतोष बांगर यांना १७३३ मताधिक्य मिळवून दिले.
शेवाळा मतदारसंघात बारा गावे असून यात माजी खा. शिवाजी माने, उबाठा शिवसेना जिल्हा प्रमुख अजय पाटील सावंत, शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते अभय पाटील सावंत, तालुका प्रमुख धनंजय पाटील, बाजार समिती संचालक दत्ता माने, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भागवत चव्हाण, माजी जि.प. सदस्य डॉ. अरूण सावंत, माजी सभापती रावसाहेब सावंत व इतर आजी-माजी पदाधिकारी जि.प. माजी अध्यक्ष नरवाडे यांची गावे आहेत. मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत कोणाला मताधिक्य मिळते याकडे लक्ष वेधले होते.
यात शेवाळा सर्कल मधून आ. संतोष बांगर यांना १७३३ मताधिक्य मिळाले. यासाठी युवा नेते अभय पाटील सावंत, तालुका प्रमुख धनंजय पाटील, बाजार समितीचे संचालक दत्ता माने यांच्याबरोबर महायुती पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. उबाठा शिवसेना जिल्हा प्रमुख अजय सावंत यांच्या शेवाळा गावातून आ. संतोष बांगर यांना ३६२ मतांचे मताधिक्य मिळवून देउन माजी सरपंच अभय पाटील सावंत यांनी आपल राजकीय वर्चस्व दाखवून दिले. शेवाळा सर्कलमध्ये कोण मताधिक्य घेत याकडे जिल्ह्याचे लक्ष होते.