संजय राऊत 'हायकमांड',त्यांच्यावर बोलणे योग्य नाही:मतदानाच्या टक्केवारीत लोकसभेलाही असाच गोंधळ - नाना पटोले
5 hours ago
1
खासदार संजय राऊत यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही, ते हायकमांड आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हणत संजय राऊत यांना टोला लगावला आहे. नाना पटोले पुढे बोलताना म्हणाले की, निवडणूक आयोगाची यंत्रणाच चुकीचरी आहे. लोकसभा निवडणुकीतही मतदानाची टक्केवारीत असाच गोंधळ झाला. निवडणूक आयोगाला तक्रार केली तर ते आम्ही बरोबर आहे, असे सांगितले. त्यामुळे तर सर्व उमेदवारांना फॉर्मनंबर 17 सी देणं बंधनकारक केले आहे, त्यांनी तो आमच्याकडे जमाही केला आहे. मतदान वाढीच्या प्रकियेत काही दोष आढळला तर त्यास निवडणूक आयोग जबाबदार राहील. नाना पटोले म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांच्या ट्विटवर बोलणे योग्य नाही. निकाल काही तासावर आला आहे. मी काल माहूरला देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी गेल्याने कालच्या बैठकीला गेलो नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. अधिकारीही करू शकतात गडबड नाना पटोले म्हणाले की, काही ठिकाणी अधिकारीही गडबड करतील, रात्रभर आमचे लोकं स्ट्रॉगरुमच्या बाहेर थांबतील. मतदान मोजणी केंद्रावर आमची टीम थांबणार आहे. आमचा कोणताही आमदार कुठेही जाणार नाही. आम्ही आमचे सर्व आमदार निकाल लागताच मुंबईत बोलून घेणार असून सरकार स्थापनेसाठी दावा करणार आहोत. कारण सत्ता स्थापनेसाठी वेळ कमी आहे. उद्या रात्री सत्तास्थापनेचा दावा करणार नाना पटोले म्हणाले की, उद्या दुपारपर्यत निकाल आले तर उद्याच सर्व आमदारांना बोलवून घेत त्यांच्या सह्यांचे पत्र घेऊन रात्रीच राज्यपालांकडे जाणार आहोत. कारण या सरकारचा 26 तारखेला शेवटचा दिवस आहे.
महायुतीमध्ये गडबड सुरू आहे ते काही पाप करू शकतात. भाजपचा काही अपक्षांना पाठिंबा असून शिंदे गटाच्या उमेदवाराला विरोध आहे. ते उमेदवार आमच्या संपर्कात असल्याचा दावा पटोले यांनी केला आहे. आज काँग्रेस उमेदवारांची बैठक नाना पटोले म्हणाले की, आम्ही काँग्रेस उमेदवारांना मतदान मोजणी प्रक्रिया समजून सांगणार आहोत. कुठल्या टेबरवर माणसे बसवली पाहिजे, हे आम्ही आज उमेदवारांना सांगणार आहोत.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)