संजय शिरसाट तडकाफडकी मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी दाखल:कालीचरण महाराजांशी संबंध नाही, पैसे वाटपावर देखील दिले स्पष्टिकरण
3 days ago
1
लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुतीला जोरदार फटका बसला होता. याच पार्श्वभूमीवर प्रथम छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय शिरसाट हे तातडीने मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल झाले. त्यामागे कारणही तसेच आहे. संजय शिरसाट यांच्या प्रचार सभेमध्ये कालीचरण महाराजांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर आक्रमक भाषेत टीका केल्याची चर्चा मतदारसंघामध्ये सुरु झाली. त्यामुळे आपल्याला आता विधानसभा निवडणुकीत त्याचा फटका बसायला नको, त्यामुळे संजय शिरसाट मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. याविषयी बोलताना संजय शिरसाट यांनी सांगितले की. कालीचरण महाराजांशी माझा काही संबंध नाही. मी असा कोणताही कार्यक्रम आयोजित केलेला नव्हता. मनोज जरांगे पाटील यांचा नेहमीच मी आदर करत आलेलो आहे. माझ्या मतदारसंघातच कालीचरण महाराजांची सभा झाली असली तरी त्याच्याशी माझा संबंध नसल्याचे शिरसाट यांनी म्हटले आहे. लोकांमध्ये गैरसमज निर्माण होत असल्याचे देखील ते म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांच्या मध्ये आणि माझ्यामध्ये केवळ औपचारिक चर्चा झाली असल्याचे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. पैसे वाटपावर देखील प्रत्युत्तर मतदारसंघांमध्ये अफवा उठवण्याचा प्रयत्न केला जात आहे. विरोधांना त्यांचा पराभव दिसत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे. पश्चिम मतदार संघातील उमेदवाराच्या वतीने मतदारांना पैसे वाटप करून मतदान कार्ड आणि आधार कार्ड जमा केले जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणातील दोन आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे. यावर शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काय म्हणाल होते कालिचरण महाराज कालीचरण महाराज म्हणाले, हिंदू कशासाठी मतदान करतात तर टोमॅटोचे, पेट्रोलचे भाव वाढले, रस्ते खराब झाले. या फालतू गोष्टींकडे हिंदू लोक लक्ष देतात. मी ब्राह्मण, क्षत्रिय, बनिया, दलित आहे, असे म्हणून सडक्या जातीयवादाचे शेण खातात. आता एक आंदोलन सुरू झालं होतं माहिती आहे ना, हिंदू-हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं. कशी हवा होती त्या आंदोलनाची, लाखो लोक मुंबईत आले होते. मला टेन्शन कशाचं आलं होत माहीत आहे का? हे लोक जेवतील कुठं आणि करतील कुठं अन् जातील कुठं? मग त्यांच्या नेत्याने एका थडग्यावर चादर चढवली. यामध्ये जातपात आरक्षणाच्या काही गोष्टी नाहीत. यांचा नेता हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे. आपण मतदानासाठी जात नाही. त्यामुळे मुस्लिमधर्जिणे लोक राजा बनू लागले आहेत. मुसलमानांना खुश करण्याचा प्रयत्न होत आहे, कारण ते मतदानात सहभागी होतात. मौलाना एकतर्फी मतदान करण्याचे आवाहन करतात. सर्व आमदार-खासदार मुस्लिमांचे तळवे चाटतात. जातीसाठी माती खाऊ नका. जगदंबेची कृपा हवी असेल तर धर्मासाठी मतदान करा. दंगली मुस्लिमांकडूनच होतात. लव्ह जिहाद टाळण्यासाठी डुकराचा दात सोबत ठेवा, असा सल्लाही त्यांनी दिला होता. जरांगे पाटील यांचेही प्रत्युत्तर या विषयी मनाेज जरांगे पाटील म्हणाले की, मी वारकरी संप्रदायाचा सन्मान करतो आणि संतांचाही आदर करतो आणि करायलाच पाहिजे. हिंदूंचा मी कट्टर आहे. त्यामुळे छत्रपतींचे हिंदुत्व आणि विचार मला मान्य आहेत. त्यांना काय बरळायचे ते बरळू द्यावे. आपण बोलू नये. कारण ज्याने पक्षाचा ठेका घेतला आहे. त्याबद्दल आपण काय बोलावे. आम्ही तर गोरगरिबांना मोठे व्हावे यासाठी आरक्षण मागत आहोत. शेवटी देवाधर्माचा सन्मान करणे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वाचा सन्मान करणे एक मावळा म्हणून माझे कर्तव्य आहे. मी त्यांना तोंड टाकून बोलू शकत नाही. शेवटी छत्रपतींनी शिकवण दिलेली अाहे की, संत-महात्म्यांचा, गोरगरिबांचा सन्मान करा. बोलला तर बोलू द्या. सुंदर महिला सगळ्या भोगल्या पाहिजेत, असे म्हणणारे तेच आहेत ना. बहुतेक तेच बाबा आहेत हे. मी संत-महंतांचा आदर करतो. हिंदूंतला कट्टर वर्ग म्हणजे मराठा आहे. हे असे टिकल्या लावणारे लोकांना सांगू शकतात. सुपाऱ्या घेऊ शकतात. जाताना नारळ, पैसे, जेवण चांगले पाहिजे. हे काही जण रक्त पिणारेच आहेत. काही चंागले आहेत. काही जण हराळ खाणारे आहेत. पण यांच्यामुळे धर्माला काही होणारच नाही. मराठा कट्टर आहेत.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)