महाराष्ट्रामध्ये विविध सण-उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करतात. प्रामुख्याने पद्मदुर्ग किल्ल्यांची प्रतिकृती बनवण्याचा आनंद दिवाळीच्या सुटीमध्ये विद्यार्थ्यांनी घेतला असल्याची माहिती संजीवनी स्कूलच्या प्राध्यापिका दीपाली लोहार यांनी दिली. कोपरगाव तालुक्याच्या उपनगरातील शंकरनगर येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुटीमध्ये मामाच्या गावाला न जाता दिवाळीची सुटीचा आपला वेळ छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी किल्ल्यांपैकी शत्रुच्या ताब्यात असलेल्या पोर्तुगीज व इतर आक्रमण यापैकी जंजिरा किल्ल्यावर लक्ष ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पद्मदुर्ग किल्ल्या बनवला. दीपाली लोहार यांनी मैदानी खेळाबरोबरच किल्ले बनवण्याचा मनमुराद आनंद लुटला. शाळेतील पाटी पुस्तक सोडून धिंगामस्ती, मौजमजा, नवनवीन कपडे, फटाके, गाण्याच्या भेंड्या, मैदानी खेळ, लाडू करंज्या, गोडधोड आदींवर बच्चे कंपनी ताव मारत असते. छत्रपती शिवाजीराजे यांनी मावळ्यांच्या साथीने स्वराज्य निर्माण करत एक आदर्श राजा म्हणून कारकीर्द केली. त्या संस्काराची पाळेमुळे बिजे आपल्या पुढच्या पिढीमध्ये उतरली पाहिजे, हा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. भ्रमणध्वनीच्या विश्वात अलिकडे मुला मुलींचा, तरुण पिढीचा इतिहासाकडे बघण्याचा कल कमी कमी होऊ लागला. त्यामुळे दीपाली लोहार यांनी परिसरातील आपल्या विद्यार्थ्यांना किल्ला बनवून त्या काळात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मुलींनी किल्ल्याच्या खेळाला पहिला दिवा देवासाठी, ज्याच्यामुळे मंदिर आणि मंदिरात देव असल्याचा भास होतो, असे बोधवाक्य देऊन आपल्या बुद्धीची चुणूक दाखवून दिली. यामध्ये विद्यार्थी सिद्धी लोहार, शौर्य लोहार, अर्जुन कपिले, वेदिका उगले, आर्य उदावंत ,विराज अहिरे, गौरेज बुधवंत, रुद्र लवंगारे, श्रावणी डगळे, साहिल विसपुते, आदित्य लोहार, विधी विसपुते, साई वाघ, अंश बागुल, अक्षदा उदावंत, समर्थ विसपुते, साईराज डगळे, वेदांत डगळे, वेदिका गरड ,शिवराज पवार, प्रणव लोहार यांनी परिश्रम घेतले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)