संत गाडगेबाबा यांचा प्रत्येकाने आदर्श घेऊन स्वच्छतेविषयी जागरुक व्हावे:डॉ.विखे पा.अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.उदय नाईक यांचे प्रतिपादन

2 days ago 2
स्वच्छ परिसर, सुंदर परिसर या उक्तीनुसार स्वच्छतेने आरोग्यात होणारे सकारात्मक बदल व त्यातून मिळणाऱ्या उत्साहातून आपल्यात आमुलाग्र बदल घडून येतात. रोज आपले घरच नाहीतर कामाचे ठिकाण, क्रीडांगण, आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. इतरांनाही स्वच्छतेचे महत्त्व पटवून द्यावे. श्री संत गाडगेबाबा यांच्या जीवनाचा आदर्श घेवून स्वच्छतेविषयी प्रत्येकाने जागरुक झाले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ.प्राचार्य डॉ. उदय नाईक यांनी केो. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ आणि ग्रीन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान दिन साजरा करण्यात आला. भारत सरकारने २०१४ मध्ये सुरु केलेल्या स्वच्छता सप्ताहा अंतर्गत स्वच्छता अभियान २०२४ हा उपक्रम राबविण्यात आला. त्यावेळी महाविद्यालयातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना शिक्षक समन्वयक प्रा. मंदार बिडवे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता अभियान कसे राबवावे तसेच स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण करुन स्वच्छतेचा प्रसार कसा करावा याचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. मंदार बिडवे, राष्ट्रीय सेवा योजना शिक्षक समन्वयक, प्रा. सुनिल मांढरे, विद्यार्थी विकास मंडळ शिक्षक समन्वयक, प्रा. गणेश डहाणे, ग्रीन क्लब शिक्षक समन्वयक, डॉ. अनिकेत विखे, प्रा.एस.बी. जोशी, प्रा. दत्ता ठाणगे, प्रा. एस. के. शेख, प्रा. नाना मुळीक, प्रा. माधवी नेरकर तसेच प्रा. नितीन पोंधे व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. हा कार्यक्रम आयोजीत करण्यासाठी टेक्निकल डेप्युटी डायरेक्टर सुनील कल्हापुरे, प्रभारी सेक्रेटरी जनरल डॉ. पी.एम. गायकवाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय पी. नाईक तसेच सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे मार्गदर्शन लाभले. निर्जंतुकीकरण आणि कचरा व्यवस्थापनाचे विद्यार्थ्यांना धडे याप्रसंगी वर्ल्ड एन्हार्नमेंटल हेल्थ डे २०२४ ही साजरा करण्यात आला. त्यात सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण निर्माती कशी करता येईल, यावर प्रकाशझोत टाकला. यावेळी स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, प्रदूषण नियंत्रण, निर्जंतुकीकरण आणि कचरा व्यवस्थापन याचे धडे विद्यार्थ्यांना देण्यात आले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article