संतप्त गावकऱ्यांचे अनोखे आंदोलन!:रस्त्यावरील खड्यात जेवण करून केला सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध

2 hours ago 1
परभणी येथील जिंतूर-येलदरी रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून मोठ-मोठी खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यात अनेकांना जीव देखील गमवावे लागले असल्याचे गावकाऱ्यांचे महणणे आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे संपूर्णतः दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी अनोखे आंदोलन केले आहे. संतप्त गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निषेधार्थ तसेच प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अनोखे आंदोलन केले आहे. येथील नागरिकांनी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात बसून जेवण करत सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध व्यक्त केला आहे. तसेच येलदरी रस्त्यावर दीड हजार खड्डे पूर्ण झाल्याबद्दल शहरातील प्रमुख कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खड्डे जेवणाचे निमंत्रण पत्रिका देऊन मोठ्या खड्ड्याजवळ जेवणाच्या पंगतीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, जिंतूर येलदरी मार्गे विदर्भात जाण्यासाठी एकमेव मार्ग असल्याने या रस्त्यावर मोठ्या संख्येने वाहतुकीची वर्दळ असते. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघातांचे प्रकरणे वाढली असल्याचे समोर आले आहे. या अपघातात अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. मात्र असे असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे या खड्ड्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने येथील ग्रामस्थ संतप्त झाले होते. येलदरी, शेवडी, मणकेश्वर, केहाळ, आंबरवाडी आदी गावातील नागरिकांनी खड्ड्यात जेवणाची पंगत वाढत अनोखे आंदोलन केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article