सतीश काळेचा लासलगावकरांना पुन्हा एकदा कोट्यवधी रुपयांचा गंडा:महिनाभरात दुप्पट रक्कम देण्याच्या बहाण्याने लोकांचे दिवाळीत काढले दिवाळं

2 hours ago 1
लासलगावसह जिल्हाभरात आणि अनेक जिल्ह्यांमध्ये ७ ते ८ वर्षांपूर्वी ढोकेश्वर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी नावाने शाखा स्थापित करून अनेकांना करोडो रुपयांचा गंडा घातल्यानंतर विविध जिल्ह्यातील कारागृहात अटक झालेली असताना जामीनावर बाहेर येऊन पुन्हा सोन्याची फसवी स्कीम टाकत हजारो लोकांना गंडवणारा सतीश काळे पुन्हा एकदा 900 ते 1000 कोटी रुपयांचा घोटाळा करून स्वतःहून जेलमध्ये हजर होत फरार झाला आहे. सतीश काळे याने महिनाभरात दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून लासलगावकरांना पुन्हा एकदा 900 ते 1000 कोटी रुपयांना गंडवले आहे. सतीश काळे याने लासलगाव, दादर, मिरा रोड, अहमदाबाद ,कोलकाता या ठिकाणी शाखा उघडत ठेवीदारांना दुप्पट रकमेचे आमिष दाखवत कोट्यवधी रुपये लुटले. भाजीपाला विक्रेते, भंगार विक्रेत्यांपासून अनेक व्यापाऱ्यांनी दुप्पट रकमेच्या लालसेपोटी आपली कष्टाची कमाई लावली होती. भारतात अनेक ठिकाणी शाखा उघडून लोकांची दिवाळी गोड करणार असल्याचे आश्वासन सतीश काळे याने दिले होते. दुसऱ्या देशात पलायन करण्याची चर्चा सतीश काळे याचे खासगी जेट विमान घेण्याचे स्वप्न आहे. गेल्यावेळी घोटाळा करण्यापूर्वीच त्याला हेलिकॉप्टर घ्यायचे होते. पण त्याआधीच त्याला अटक झाली. जामीन मिळाल्यानंतर नेपाळमध्ये पळून जाण्याची तयारी असून तेथून दुसऱ्या देशात पलायन करण्याचा त्याचा इरादा असल्याची परिसरात चर्चा होत आहे. आता 900 ते 1000 कोटी रुपयांचा घोटाळा केल्यानंतर सतीश काळे याने धाराशिव जिल्ह्यात असलेल्या लोहरा पोलिस ठाण्यामध्ये जुन्या केसमध्ये स्वतःहून हजर होत अटक करुन घेतली आहे. हेही वाचा... द्राक्ष उत्पादकांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांचा कायदेशीर बंदोबस्त करूच:नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक कराळे यांचे आश्वासन‎ लासलगाव शेतीमाल विक्री करताना आपण बाजारपेठेचा अंदाज घेतला पाहिजे. व्यापारी किंवा पायलट यांचे पूर्वीचे व्यवहार तपासले पाहिजेत. व्यवहार करताना पुरावा म्हणून सौदा पावती किंवा व्यवहार करतानाचे चित्रीकरणाचे पुरावे तयार केले पाहिजे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कायदेशीर इलाज करण्यात आपण अग्रभागी राहू, असे प्रतिपादन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी पिंपळगाव बसवंत येथे केले. ​​​​​​​पूर्ण बातमी वाचा... फुले दाम्पत्याचे स्मारक वादात:शिलालेखावरून 'वित्ताविना शूद्र खचले' ओळ गायब; भाजपने ठरवून अपमान केला, काँग्रेसचा आरोप नाशिक येथे तब्बल 4 कोटी 68 लाख खर्चून बांधलेले महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे स्मारक वादात सापडले आहे. स्मारकातील शिलालेखावरून महात्मा फुले यांच्या अखंडातील 'वित्ताविना शूद्र खचले' ही ओळ गायब केलीय, तर एका ओळीत सोयीनुसार बदल केलेत. पूर्ण बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article