सध्या तरी अजितदादांसोबतच:फलटणच्या आमदाराचे सूचक विधान, अजित पवारांना बसणार का धक्का?

3 hours ago 1
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवार संधीच्या शोधात असल्याचे दिसत आहेत. पक्षाकडून उमेदवारी मिळत नसल्याचे चिन्ह दिसत असतील तर दुसऱ्या पक्षात जाऊन उमेदवारी मिळवण्यासाठी देखील सेटिंग लावली जात असल्याचे दिसते. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पक्षातील दोन मोठे नेते शरद पवारांच्या पक्षात जाण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर व त्यांच्यासोबत फलटणचे आमदार दीपक चव्हाण देखील शरद पवारांच्या पक्षात जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र आपण सध्या तरी अजितदादांसोबत असल्याची प्रतिक्रिया आमदार दीपक चव्हाण यांनी दिली आहे. विशेष म्हणजे आठवडाभरापूर्वीच अजित पवारांनी दीपक चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली होती. काय म्हणाले आमदार दीपक चव्हाण? अजित पवारांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना ओघाने आपली उमेदवारी जाहीर केली होती. अजून जागावाटप झाले नसल्याने उमेदवारीचे काही ठरले नाही, असे दीपक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. तसेच रामराजे निंबाळकर तुतारी हातात घेणार असल्याच्या चर्चेवर बोलताना दीपक चव्हाण म्हणाले, अजून तशी काही चर्चा नाही. रामराजेंची तशी कोणतीही भूमिका नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले आहे. दरम्यान, रामराजे निंबाळकर हे कार्यकर्त्यांशी संवाद साधून पुढील राजकीय निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या पक्षात अनेक मोठ्या नेत्यांचे प्रवेश होताना दिसत आहेत. इंदापूर येथील हर्षवर्धन पाटील यांनी देखील तुतारी हाती घेतली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जुन्नर येथील आमदार अतुल बेनके यांच्या विरोधात शरद पवारांनी नवीन शिलेदार मैदानात उतरवणार असल्याचे बोलले जात आहे. जुन्नर विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषद माजी सदस्य मोहित ढमाले यांना शरद पवारांच्या पक्षाकडून येथून उमेदवारी दिली जाऊ शकते. .

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article