‘सर्वोपचार’मधील ब्लड बँकेमध्ये दलाल सक्रिय; रुग्णांची पिळवणूक:रक्ताच्या पिशव्यांसाठी नातेवाइकांची केली जात आहे आर्थिक लूट
6 days ago
2
रुग्णाला जीवदान देण्यासाठी रक्त मिळवण्याची धडपड करणाऱ्या गरजू रुग्णांच्या नातेवाइकांना येथील सर्वोपचार रुग्णालयातील ‘ब्लड बँके'च्या अवतीभवती हेरून त्यांना लागणारे रक्त उपलब्ध करुन देणारी सात ते आठ दलालांची टोळीच सक्रिय झाली आहे. दरदिवशी गरीब रुग्णांची आर्थिक पिळवणूक या दलालांकडून होत आहे. रक्ताच्या एका पिशवीसाठी पंधराशे ते दोन हजार रुपये रुग्णांच्या नातेवाइकांकडून हे तथाकथित दलाल घेत असल्याची माहिती आहे. याबाबतची एक तक्रारही अलीकडेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता व पोलिस अधीक्षक यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित सर्वोपचार रुग्णालयात अकोला जिल्हाच नव्हे तर शेजारील बुलडाणा, वाशीम, हिंगोली, यवतमाळ या चार ते पाच जिल्ह्यातील गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र, रुग्णालयातील दलालांमुळे गरीब रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत उपचार उपलब्ध असूनही आर्थिक खर्च करण्यास भाग पाडले जात आहे. खेड्यापाड्यातील अशिक्षित रुग्णांच्या नातेवाइकांना हेरून हे तथाकथित रुग्ण सेवक आणि समाजसेवक म्हणवणारे सात ते आठ जण एखाद्या रुग्णाला रक्ताची आवश्यकता भासत असल्याचे लक्षात येताच सर्वोपचार रुग्णालयातील दलाल सक्रिय होतात. रुग्णाच्या नातेवाइकाला गाठून त्याच्याकडे रक्त तत्काळ लागत असेल तर पैशांची मागणी करतात. पैसे रक्त पेढीत द्यावे लागतात, असे सांगायलाही ते विसरत नाहीच. पैसे दिले नाही तर त्याची अडवणूक केली जाते. सर्वोपचार रुग्णालयात रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास शासकीय रक्तपेढी आहे. मात्र, या ठिकाणी बहुतांश वेळा रक्त उपलब्ध नसल्याचे कारण रुग्णांच्या नातेवाइकांना सांगितले जाते. त्यामुळे रुग्णाचे नातेवाइक रक्तासाठी वणवण भटकतात. याचाच फायदा सर्वोपचार रुग्णालयात असलेले दलाल उचलतात आणि रक्ताची गरज असलेल्या रुग्णाच्या नातेवाइकाला रुग्णांना या ठिकाणी असलेल्या दलालांकडून पैशांची मागणी केली जात असल्याचे आढळून आले आहे. ^रुग्णांसाठी मोफत असणाऱ्या रक्ताची दलाली करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या तथाकथित समाजसेवकांवर प्रशासनाने कारवाई करावी. तशी रितसर तक्रार सर्वोपचार रुग्णालय प्रशासन व पोलिस प्रशासनाकडे केली आहे. - ऋषभ राजेश काळे, तक्रारदार ^रुग्णांना रक्ताची पिशवी उपलब्ध करुन देतो, असे सांगून पैसे उकळले जात असतील तर नागरिकांनी कुणालाही पैसे देऊ नयेत. पैसे मागणाऱ्यांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. त्याची योग्य ती दखल घेतली जाईल. - मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, जीएमसी त्यांना चांगल्या सुविधा मिळवून देतो, रक्त मिळवून देतो, हवी ती शस्त्रक्रिया करुन देतो, आपली आेळख आहे, असे सांगून पैशांची मागणी करत असल्याच्या वाढत्या तक्रारी आहेत. यामुळे प्रामाणिकपणे रुग्णसेवा करणारे काही खरे सामाजिक कार्यकर्ते बदनाम होत आहेत. सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्यांची आर्थिक लूट केली जाते. नागरिकांची अडचण पाहून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जाते. रुग्णाच्या नातेवाइकांवर पैसे देऊन रक्ताची गरज पूर्ण करण्याची वेळ येते. भीतीपोटी नागरिक तक्रार करत नसल्याने पैशांची मागणी करणाऱ्यांचे फावत आहे. या दलालांच्या टोळीला कुणाचा सपोर्ट आहे, याचा तपास लावावा, अशी मागणी या प्रकरणात पुढे आलेल्या ऋषभ काळे यांनी केली आहे. रक्तासाठी असे गंडवले जातात रुग्णांचे नातेवाईक नातेवाइकांनो, तक्रार करा पैसे मागितल्यास रुग्णालय, पोलिस प्रशासनाकडे तक्रार
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)