सहकारी साखर कारखान्यांच्या भवितव्याचा विचार होणे आवश्यक:अगस्तीचे अध्यक्ष सीतराम गायकर यांची अपेक्षा
6 days ago
2
अनेक अडचणींवर मात करून सहकारी साखर कारखाने गाळप हंगाम पूर्ण करीत आहेत. आज केंद्राने बाजारात किमान साखर दर ठरवून दिले आहेत. पण त्यात वाढ होणे अपेक्षित आहे. एफआरपी बाबतीतही सकारात्मक निर्णय न झाल्यास साखर कारखान्यांचा तोटा वाढत जाईल व पर्यायाने ते बंद पडतील. या अनुषंगाने सहकारी साखर कारखान्यांच्या भवितव्याचा विचार होणे आवश्यक आहे. इतर कारखान्यांच्या तुलनेत योग्य दर देण्याचा प्रयत्न अगस्ती कारखान्याकडून होईल. अगस्ती कारखान्याच्या कार्यक्षेत्रात यावर्षी उसाची उपलब्धता कमी आहे. तरीही साडेचार ते पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळप करून हा हंगाम आपण यशस्वी करून दाखवू, असा विश्वास अगस्ती कारखान्याचे अध्यक्ष सिताराम गायकर यांनी केले. अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा २०२४-२५ चा ३१ वा ऊस गळीत हंगाम शुभारंभ व गव्हाण पूजन समारंभ शुक्रवारी सकाळी कारखाना कार्यस्थळावर पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून गायकर बोलत होते. प्रारंभी योगी केशवबाबा चौधरी महाराज वीरगावकर, कैलास आरोटे यांच्या हस्ते ऊस मोळी व गव्हाणीचे पूजन करण्यात आले. संचालक विकास शेटे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन नामदेव शेटे यांनी केले. यावेळी संचालक अशोक देशमुख, बाळासाहेब नाईकवाडी, पाटीलबुवा सावंत, सुधीर शेळके, विक्रम नवले, बादशहा बोंबले, सचिन दराडे, सदाशिव साबळे, प्रदीप हासे व कार्यकारी संचालक सुधीर कापडणीस उपस्थित होते. सीताराम गायकर म्हणाले, केंद्र सरकारकडून एनसीडीसी मार्फत महाराष्ट्र सरकारच्या हमीवर ९४ कोटींचे कर्ज अगस्तिला यावर्षी उपलब्ध झाले नसते, तर अगस्ती चालू करणे अवघड होते. अकोल्यातील पतसंस्थांनी मोठी कर्ज रक्कम दिल्यामुळे अगस्तीची चाके फिरली. अगस्ती साखर कारखान्याने कधीच ऊस तोडणीची टाळाटाळ करत नाही. येथील कामगारांचे नऊ पेमेंट शिल्लक होते. पण तरीही कामगारांकडून नेहमी सहकार्य मिळते. काही लोकांकडून मी व माझ्या संचालक मंडळावर कर्ज वाढीवर आरोप होत राहिले. त्याचा विपरित परिणाम अगस्तीच्या कामकाजावर होतो. पण त्याकडे दुर्लक्ष करून गाळप हंगाम पुर्ण केले. केंद्र व राज्य सरकारकडून ऊस कारखान्याबाबत ऊसदर व एफआरपीबाबत सकारात्मक निर्णय घेतल्यास एक दोन वर्षात अगस्ती तोट्यातून बाहेर येऊ शकेल.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)