सहा महिन्यात 35 मुलांवर हृदय शस्त्रक्रिया:राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, 113 बालकांवर झाले मोफत उपचार

3 days ago 3
केंद्र आणि राज्य शासनाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२४ या सहा महिन्यांत जिल्ह्यात ११३ बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यात ३५ बालकांवर हृदय शस्त्रक्रिया तर ९८ बालकांवर इतर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. लहान मुलांमध्ये जन्मजात विकृती, हृदय, किडनीशी संबंधित गुंतागुंतीच्या आजारांवरील शस्त्रक्रियांचा यात समावेश आहे. लहान बालकांमध्ये वाढती हृदयाची समस्या चांगलीच अडचणीची ठरत आहे. जन्मानंतर काही लहान मुलांमध्ये एएसडी, व्हीएसडी आणि पीडीए हे हृदयाशी संबंधित आजार आढळून येतात, ज्याला ‘हृदयातील छिद्र' असेही संबोधित केले जाते. यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी बराच खर्च लागतो. मात्र, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शून्य ते १८ वर्षांपर्यंतच्या बालके आणि मुलांवर आवश्यक सर्वच मोठ्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. मागील ६ महिन्यांत ३५ बालकांवर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. जिल्ह्यातील लहान मुलांच्या हृदयविकाराची वाढती संख्या चिंताजनक ठरत आहे. विविध नामांकित रुग्णालयात होतात मोफत शस्त्रक्रिया राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम योजनेमार्फत मागील वर्षी ७८ हृदय शस्त्रक्रिया केल्या. तर १ एप्रिल ते सप्टेंबर २०२४ या सहा महिन्यांत ३५ हृदय शस्त्रक्रिया तर ९८ इतर आजारांवरील शस्त्रक्रिया झाल्या. यात डोळ्यांचा तिरळेपणा आदींचा समावेश आहे. अमरावती सुपर स्पेशालिटी, अकोला जीएमसी, आचार्य विनोबा भावे रुग्णालय सावंगी, सारक्षी नेत्रालय, नागपूर, मंुबई आदी ठिकाणच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून या मोफत शस्त्रक्रिया केल्या. चक्कर येणे, अशक्तपणा लहान मुलांमधील हृदयविकाराचे लक्षण ^लहान मुलांच्या हृदयविकाराच्या लक्षणांमध्ये चक्कर येणे, थकवा येणे, मूर्च्छा येणे आणि अशक्तपणा यांचा समावेश होतो. तर सतत ताप येणे, भूक न लागणे, जेवताना थकवा येतो, घाम येतो, रडत असताना गुदमरणे ही लक्षणे हृदयात छिद्र असण्याची असू शकतात. लक्षणे दिसताच डॉक्टरांना दाखवून उपचार घ्यावा. गरजू रुग्णांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत या मोफत शस्त्रक्रिया योजनेचा लाभ घ्यावा. - डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा शल्य चिकित्सक.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article