सहायक संचालकाच्या बदलीसाठी उपोषण सुरू:महाराष्ट्र इंजिनियर असोसिएशनकडून आंदोलन

2 hours ago 1
नगर रचना सहायक संचालक हे निष्काळजीपणे वागत आहेत. गेल्या सहा महिन्यांत नागरिकांची कामे मार्गी लागत नसल्याने त्यांना पदमुक्त करावे अथवा बदली करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र इंजिनिअर असोसिएशनच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती प्रदेश सचिव सतीश वराळे यांनी दिली. गेल्या सहा महिन्यांत या कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या सुमारे २२०० प्रकरणापैकी काही मोजक्या प्रकरणाला मान्यता मिळाली आहे. श्रीरामपूर येथे सहाय्यक संचालक कार्यालय येण्यासाठी गेली चार वर्ष आम्ही शासन दरबारी अनेक वेळा निवेदन दिले. शासनाने यातील लोकभावना व तथ्य ओळखून उत्तर नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यासाठी श्रीरामपूर येथे कार्यालयाची लोकहित लक्षात घेऊन मान्यता दिली आहे. या कार्यालयाचे कामकाज सुरू झाले. परंतु दुर्दैवाने या कार्यालयाला लोकसेवक अहितकारी अधिकारी प्राप्त झाला. अनेक इंजिनियर आर्किटेक्ट व विकसक यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे या अधिकाऱ्याविरुद्ध तक्रारी केल्या होत्या. यामुळे शासनाने त्रिस्तरीय समिती नेमली होती. या समितीने ४ व ५ सप्टेंबर रोजी चौकशीचा फार्स करून चौकशी ही तांत्रिक मुद्द्‌द्यात अडकवून याला वेगळे वळण दिले. यामुळे कार्यालयीन कामकाजात कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे उपोषणाचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article