Gokul Zirwal | नरहरी झिरवाळांचे पुत्र गोकुळ यांची शरद पवारांकडे उमेदवारीची मागणी

2 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

08 Oct 2024, 4:37 am

Updated on

08 Oct 2024, 4:37 am

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे सोमवारी (दि. ७) पुण्यात इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेत दिंडाेरीतून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून अद्यापही जागा वाटपाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटाने त्यांच्या स्तरावर इच्छुकांच्या मुलाखती सुरू केल्या आहेत. नाशिकमधील पंधराही मतदारसंघांतील इच्छुकांना मुलाखतीसाठी पाचारण करण्यात आले. पुण्यातील गुलटेकडी भागातील निसर्ग मंगल कार्यालयात शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व पक्षाच्या संसदीय समितीसमोर मुलाखती पार पडल्या. यावेळी दिंडोरीतून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या गोकुळ झिरवाळ यांची उपस्थिती सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरली.

यापूर्वी नाशिकमध्ये पार पडलेल्या मुलाखती तसेच पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेतही त्यांची उपस्थिती राजकीय चर्चेचा विषय ठरली. गोकुळ यांच्या उघड उघड भूमिकेनंतर नरहरी झिरवाळ यांनी हा आमचा घरातील मुद्दा आहे. गोकुळ हे माघार घेतील, असे सांगत नरहरी झिरवाळ यांनी या वादावर पडदा टाकला होता. मात्र, पवार गटाच्या पुणे येथे पार पडलेल्या मुलाखतींवेळी गोकुळ झिरवाळ यांनी उपस्थिती लावली. एवढेच नव्हे तर पक्षाने तिकीट दिल्यास वडील नरहरी झिरवाळ यांच्याशी दोन हात करण्याची त्यांनी तयारी दर्शविली आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत दिंडाेरीतून नरहरी झिरवाळ विरुद्ध गोकुळ झिरवाळ, अशी लढत रंगण्याची शक्यता आहे.

राज्यात महाविकास आघाडीला चांगले दिवस आहे. दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी मी इच्छुक आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे.

- गोकुळ झिरवाळ, इच्छुक उमेदवार, दिंडोरी

लोकशाहीत निवडणूक लढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण गोकुळ झिरवाळ यांच्यापेक्षा मी अधिक पावसाळे बघितले आहेत. राजकारणातील डावपेच आपण अधिक जाणून आहे. वडिलांच्या नात्याने गोकुळ यांना योग्य वेळी, योग्य ठिकाणी थांबविले जाईल.

- नरहरी झिरवाळ, उपाध्यक्ष, विधानसभा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article