Buldhana: पत्नीच्या खुन प्रकरणी मुख्य आरोपीला चिखली पोलीसांकडुन अटक

5 hours ago 1

चिखली (Buldhana):- दिनांक 30.9.2024 रोजी रात्री 10.00 वाजता सुमारास फिर्यादी केशव भानुदास महाले रा. कव्हळा व त्यांची मावस बहीण मृतक सविता समाधान सुरडकर असे त्यांच्या मोटार सायकलने घरी जात असतांना चिखली शहरात अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ आरोपी नामे समाधान धनसिंग सुरडकर वय 59 वर्ष रा. बेराळा याने कोर्टात सुरु असलेला शेतीचा वाद व कौटुंबिक कारणावरुन त्याच्या ताब्यातील कारने पत्नी सविता व तिचा मावस भाऊ केशव महाले असे डबलसिट असलेल्या मोटार सायकलला जिवाने मारुन टाकण्याच्या उद्देशाने मागुन धडक देऊन गंभिर जखमी केले असा फिर्यादी केशव भानुदास महाले यांनी जबाब दिल्याने पो. स्टे. चिखली गुन्हा(Crime) रजि. क्र. 633 / 2024 कलम 109 भारतीय न्याय संहीता प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपासावर घेतला.

आरोपीला संभाजी नगर येथून मध्यरात्री घेतले ताब्यात

सदर गुन्ह्यातील सविता सुरडकर यांचा संभाजी नगर येथे उपचार सुरु असतांना दिनांक 02.10.2024 रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने व आरोपीतांनी कट करुन सदरची घटना केल्याचे तपासात दिसुन आल्याने गुन्ह्यात कलम 103 (1), 61 (2), (अ) भारतीय न्याय सहींता प्रमाणे कलम वाढ करुन आरोपी नामे संतोष सुभाष इंगळे वय 32 वर्ष रा. हरीओम नगर चिखली यास अटक करण्यात आले होते. सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी समाधान धनसिंग सुरडकर हा घटना घडल्यापासुन फरार झाला होता व तो वारंवार त्याचे लोकेशन बदलत असल्याने तो नेमका कोणत्या ठिकाणी आहे याबाबत कोणतीही माहीती मिळत नव्हती. सदर आरोपीचा शोध सुरु असतांना दिनांक 06.10.2024 रोजी नमुद आरोपी हा संभाजीनगर शहरात लपुन असल्याची पोलीसांना मिळाली, सदर माहीती मिळताच ठाणेदार संग्राम पाटील यांननी सदर आरोपीस (accused) पकडण्यासाठी सपोनि संजय मातोंडकर, पोलीस अंमलदार अमोल गवई व राहुल पायघन यांचे पथक रवाना केले. सदर पथकाने आरोपी समाधान सुरडकर हा वेषांतर करुन सिडको भागातुन पळुन जाण्याच्या तयारीत असतांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन त्यास गुन्ह्यात अटक केली आहे.

वेषांतर करुन पळुन जाण्याची तयारी…

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, मा. अपर पोलीस अधीक्षक बि. बी. महामुणी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधिर पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांच्या नेतृत्त्वात सपोनि संजय मातोंडकर, पोउपनि नितीनसिंह चौहाण, पोना अमोल गवई, गजानन काकड, राहुल पायघन, विजय किटे, पंढरीनाथ मिसाळ, रोहीदास पंढरे, सागर कोल्हे, रुपाली उगले यांनी केली आहे. सदर गुन्ह्यातील फरार आरोपी पकडण्यासाठी सायबर पोलीस स्टेशन बुलडाणा येथील रुषीकेश खंडेराव, राजु आडवे यांनी तसेच संभाजीनगर शहरचे मा. सहा. पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख व त्यांच्या पथकाची मोठी मदत झाली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article