Published on
:
08 Oct 2024, 11:23 am
Updated on
:
08 Oct 2024, 11:23 am
तलासरी: मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर उभ्या वाहनाला धडक बसून भीषण अपघात होऊन दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धुंदलवाडी ओव्हर ब्रीज जवळ सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास गुजरात वाहिनीवर उभ्या असलेल्या मालवाहू कंटेनर वाहनाला मागे धडकून एका दुचाकीस्वाराला दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावर गुजरात वाहिनीवर तिसर्या मार्गिकेवर उभ्या असलेल्या वाहनाचा अंदाज न आल्यामुळे दुचाकी घेऊन गुजरात बाजूला जाणार्या दुचाकी स्वार रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनाला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार इश्वरसिंह चंदनसिंग करणोत (वय 47 वर्ष राहणार कासा ता. डहाणू) यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
महामार्गावर अनधिकृत रित्या वाहन उभे केल्यामुळे वाहनाला धडकून दुचाकीस्वाराला अपघात झाल्याचे निदर्शनास येत असून याप्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास तलासरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जे.एस.उमतोल करत आहेत.