Kasarshirsi-Killari taluka: कासारशिरसीसोबत किल्लारी तालुका निर्मिती होणार

2 hours ago 1

आ. अभिमन्यू पवार यांची ग्वाही

कासारशिरसी (Kasarshirsi-Killari taluka) : कासारशिरसीच्या विकासासाठी महायुती च्या सरकारने भरीव निधी उपलब्ध करून दिल्याने अल्पावधीत (Kasarshirsi-Killari taluka) कासारशिरसी विकासाच्या नकाशावर आले असून, तालुका निर्मितीच्या अगोदरच अपर तहसील कार्यालयसह अन्य कार्यालये उभारले जात असून येणाऱ्या दोन वर्षांत एका प्रशासकीय इमारतीच्या माध्यमातून सर्वच कार्यालये उभारले जातील. महाराष्ट्रात जेव्हा नवीन तालुका निर्मिती केली जाईल, तेव्हा अग्रस्थानी कासारशिरसी व किल्लारी तालुक्याची निर्मिती होईल, अशी ग्वाही आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली.

दोन वर्षांत प्रशासकीय इमारत उभारणार

कासारशिरसी (Kasarshirsi-Killari taluka) येथील ४० कोटीच्या कासार सिरसी अपर तहसील कार्यालय व महसूल कर्मचारी निवासस्थाचे भूमिपूजन प्रसंगी ते (दि.८) रोजी बोलत होते. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. बी. निळकंट, उपअभियंता बांधकाम अनिता पाटील, गटविकास अधिकारी सोपान अकेले, अभियंता किरण पाटील, ए. एम. मुळजकर, सरपंच मोनाली ज्ञानेश्वर मडोळे, उपसरपंच विरेश चिंचनसुरे, कासारशिरसी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे, अल्पसंख्याकचे जिलानी बागवान, धनराज होळकुंदे, शहराध्यक्ष मयूर गबूरे, सचिन कडतने, महिला अध्यक्षा कविता गोरे, कल्पना ढविले, कल्पना गायकवाड, उप अभियंता लदाफ शखील आदीसह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

आ. अभिमन्यू पवार पुढे म्हणाले की कासारशिरसी च्या विकासामध्ये अनेकांनी अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र आपण मात्र सामान्यांचे आमदार आहोत, याची जाणीव ठेवून सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून कासारशिरसीच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून (Kasarshirsi-Killari taluka) कासारशिरसीचा कायापालट करण्याचे काम केले. या भागातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कामे या काळात पूर्ण होत असून कासारशिरसी पाणीपुरवठा योजना, कोकळगाव बॅरेज, कासारशिरसी – कोराळी रस्ता आदी कामे मार्गी लागले आहेत.

मागच्या काळात राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केले!

येणाऱ्या काळातही कासारशिरसी विकासाची जबाबदारी माझी आहे. मागच्या काळात राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केल्याने या भागातील विकासाचा अनुशेष निर्माण झाला आहे. मात्र आता शासनाच्या तिजोरीतून येणारा पहिला घास या भागातील विकासाला देण्यात येत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article