फरार झाकीर नाईक याने महिलांबाबत असे विधान केले की पाकिस्तानीही खवळले

2 hours ago 1

भारतातून धार्मिक विद्वेष पसरविल्याने गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झालेला वादग्रस्त मुस्लीम धर्म प्रवचनकार झाकीर नाईक याने पाकिस्ताना वादग्रस्त विधान केले आहे. सध्या पाकिस्तानच्या निमंत्रणावरुन झाकीर नाईक तिकडेही इस्लामचे लेक्चर देण्यासाठी तिकडे गेले आहेत. त्याने भारतात धार्मिक हिंसा पसरविणारी विधाने केल्याने त्याच्या विरोधात एनआयए आणि ईडीचा ससेमिरा लागल्याने झाकीर नाईक याने मलेशिया गाठले होते. आता पाकिस्तान युट्युबरला दिलेल्या मुलाखतीनंतर तो पुन्हा चर्चेत आला होता. पाकिस्तानात त्याने महिलांबाबत वादग्रस्त विधान केल्याने पाकिस्तानातील लोकही नाराज झालेले आहेत.

महिलांच्या लग्नाबद्दल काय म्हणाला ?

झाकीर नाईक याला लेक्चर दरम्यान एक प्रश्न विचारण्यात आला. जर कोणा महिलेला लग्नासाठी योग्य पुरुष सहकारी मिळाला नाही तर त्यांनी काय करावे ? या प्रश्नावर झाकीर नाईकने मोठे विचित्र उत्तर दिले. या उत्तराचा कोणताही प्रगतीशील पुरुष विरोध करेल. तो म्हणाला की महिलांबाबत मध्ययुगीन विचाराचे विधान केले. एक्सवर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. कैसर नावाच्या पाकिस्तानी अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर झाला आहे.

झाकीर नाईकचा व्हीडीओ येथे पाहा –

Either wed a joined antheral oregon go a “bazaari aurat”. Zakir Naik is continuously coming up with problematic statements. Who invited him? Please don’t invitation specified illiterate radical adjacent time! pic.twitter.com/XmiXiKMgpS

— Saad Kaiser 🇵🇰 (@TheSaadKaiser) October 7, 2024

लग्न न करणाऱ्या महिलांना बाजारु म्हणाला

झाकीर याने जर एखाद्या महिलेला अनुरुप जोडीदार मिळाला नाही तर तिच्या दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय तिने अशा पुरुषाशी लग्न करावे ज्याला आधी एक पत्नी आहे. किंवा तिने बाजारु महिला बनावे.त्याने बाजारु महिला या शब्दाची बरोबरी सार्वजनिक मालमत्तेशी ( पब्लिक प्रॉपर्टी ) केली आणि म्हणाला की याहून चांगला शब्द माझ्याकडे नाही !  झाकीर नाईक यावरच थांबला नाही तर पुढे म्हणाला की जर तुम्ही कोणा चांगल्या महिलेला विचारले की लग्नासाठी अविवाहीत पुरुष मिळत नसेल तर दोन पर्याय आहेत असे सांगितले. एक पर्याय म्हणजे अशा पुरुषाशी विवाह करा ज्याला एक पत्नी आधीच आहे.दुसरा पर्याय बाजारु महिला बनावे.तर कोणतीही चांगली महिला म्हणेल की मला पहिला पर्याय पसंद आहे.

पाकिस्तानातही विरोध

झाकीर नाईक याच्या महिलांसंदर्भातील टिप्पणीवर पाकिस्तानातूनच विरोध होत आहे. हा व्हिडीओ शेअर करत साद कैसर यानी लिहीले आहे की झाकीर नाईक लागोपाठ वादग्रस्त विधाने करीत आहे. त्याला कोणी बोलावणे ? पुढच्या वेळी अशा मूर्ख लोकांना बोलावू नये. फौजिया नावाच्या एका युजरने पोस्ट करत म्हटलेय की त्यांच्या मते कोणतीही महिला जी लग्न करु इच्छीत नाही ती सार्वजनिक संपत्ती आहे ? या व्यक्तीला धार्मिक विद्वान तर दूर एक सभ्य व्यक्ती कसे मानावे ? तालिबानी मानसिकतेचा दिसत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article