जळगाव महायुतीच्या मेळाव्यात नाराजी नाट्य:लोकसभेला भाजपवाले नवरीवाले होते अन् आता आम्ही, मेळाव्यातील भाजप नेत्याच्या गैरहजेरीवर गुलाबरावांनी व्यक्त केली खंत

5 hours ago 1
लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही नवरदेववाले होतो. भाजपवाले नवरी वाले होते. आता आम्ही नवरीवाले आहोत, भाजपवाले नवरदेव आहेत, भारतीय जनता पक्षाची आमची मंडळी बोलावल्यानंतरही या मेळाव्यासाठी आलेले नाहीत. पण यावर आम्ही मार्ग काढू, त्यांना विनंती करू, असे म्हणत शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावच्या महायुतीच्या मेळाव्यात नाराजी व्यक्त केली आहे. गुलाबराव पाटील म्हणाले की, मी भाषणातही हे बोललो आहे. आता पक्षाच्या वरिष्ठांकडे देखील या गोष्टी मांडणार आहे. महायुतीमध्ये अशा गोष्टी घडता कामा नये. जेणेकरून याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात होईल, असे मंत्री पाटील यांनी म्हटले आहे. नेमके काय घडले? जळगाव जिल्ह्यात महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला भाजपचे कुणीही नेते उपस्थित नव्हते, भाजपचे नेते बोलवूनदेखील उपस्थित न राहिल्याने या प्रकरणी शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी खंत व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत आपण एकसंघ राहिल्यामुळे काय परिणाम झाला हे देशाने पाहिले,त्याच प्रकारे आपण जर एकसंघ राहिलो तर आपण जळगावमधील सर्व जागा निवडून आणू शकतो असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला. तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना याबाबत आम्ही माहिती कळवणार आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे. किशोर पाटील सर्वप्रथम गुवाहटीला गुलाबराव पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्याअगोदर पाचोऱ्यात गुपचूप आले होते. एकनाथ शिंदेंचा अचानक दौरा आला. त्यावेळी देखील मी पाणीपुरवठा मंत्री होतो. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यामध्ये पाचोरा शहराचा सर्वात मोठा सिंहाचा वाटा आहे. किशोर पाटील सर्वात पहिले एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेले होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article