सरकारचे दूत बना, गौरव करुन प्रोत्साहन भत्ता देऊ : एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

5 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

08 Oct 2024, 6:40 am

Updated on

08 Oct 2024, 6:40 am

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पोलिस पाटील हे सरकारचे कान नाक-डोळे आहेत. तुम्ही सरकारचे दूत म्हणून काम करा. सरकार तुम्हाला प्रोत्साहन भत्ता देऊन योग्य गौरव करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ते रविवारी (दि.६) पोलिस पाटील संघटनेच्या आभार मेळाव्यात बोलत होते.

महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील असोसिएशनच्या वतीने समृद्धी लॉन्स, हर्सल सावंगी रोड येथे राज्यस्तरीय आभार मेळावा व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. पोलिस पाटलांचे मानधन शासनाने १५ हजार रुपये केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे आभार पोलिस पाटील संघटनेने व्यक्त केले.

या मेळाव्यास जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, शहर व औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट, आ. प्रदीप जयस्वाल, आ. रमेश बोरनारे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष महादेव नागरगोजे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दीप प्रज्वलनाने मेळाव्यास सुरुवात झाली. प्रास्ताविक महादेव नागरगोजे यांनी केले. यावेळी मुख्यमंत्र्यांचा पोलिस पाटील यांनी सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पोलिस पाटील हे प्रशासनाचे नाक-कान डोळे आहेत.

आपल्याला २४ बाय ७ काम करावे लागते. सरकारही असेच २४ बाय ७ काम करणारे आहे. आपले हे प्रामाणिक काम असल्यानेच शासनाने आपले मानधन साडेसहा हजार रुपयांवरून १५ हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. सढळ हस्ते न्याय दिला आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी तसेच समाजातील विविध घटकांसाठी शासनाने राबविलेल्या योजनांचा उल्लेख मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. पोलिस पाटील यांनी आपल्या गावात या योजना लाभार्थीपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक अध्यक्ष महादेव नागरगोजे यांनी केले. मंत्री अब्दुल सत्तार यांनीही मनोगत व्यक्त केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article