निकाल येताच जम्मू-काश्मीरचा मुख्यमंत्री ठरला, केंद्रशासीत प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री होणार…, ‘आप’ची कामगिरी…

2 hours ago 1

Jammu-Kashmir Election Result 2024: जम्मू-काश्मीर केंद्रशासीत प्रदेश झाल्यानंतर प्रथमच निवडणूक झाली. या निवडणुकीत मतदारांनी मतदानाच्या आकडेवारीचा विक्रम केला. जम्मू-काश्मीरमध्ये खरी लढत भारतीय जनता पक्ष, नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडी आणि पीडीपीमध्ये होती. त्यात नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडीला बहुमत मिळाले. निवडणुकीचे निकाल येताच जम्मू-काश्मीरमधील मुख्यमंत्रीसुद्धा ठरला. नॅशनल कॉन्फरन्सला 42 तर काँग्रेसला 7 जागा मिळत आहेत. भाजप 29 जागांवर विजय मिळवत आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला बहुमत मिळाल्यामुळे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुला यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली. त्यांचा मुलगा उमर अब्दुला जम्मू-काश्मीरमध्ये मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणार असल्याचे त्यांनी म्हटले.

उमर अब्दुल्ला यांचा विजय

जेकेएनसीचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनी बडगाम विधानसभा मतदार संघातून विजय मिळवला आहे. त्यांनी पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या आगा सय्यद मुनताजीर ​मेहदी यांचा 18,000 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. अब्दुल्ला गंदरबलमधून आघाडीवर होते. अब्दुला यांनी 2014 मध्ये श्रीनगरमधील सोनावर आणि बडगाम जिल्ह्यातील बीरवाह या दोन जागांवरून निवडणूकही लढवली होती. त्यांनी बीरवाह जागेवर विजय मिळवला होता. तसेच 2024 मधील लोकसभा निवडणुकीत अब्दुल्ला उत्तर कश्मीरमधील बारामूला लोकसभा मतदार संघात उभे राहिले होते. परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला.

आपचा पहिला विजय

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने (आप) विजय मिळवला आहे. आप उमदेवाराने डोडा विधानसभेची जागा जिंकली आहे. आपचे उमेदवार मेहराज मलिक यांनी भारतीय जनता पक्षाचे गजयसिंह राणा यांचा ४७७० मतांनी पराभव केला आहे.

हे सुद्धा वाचा

मेहराज यांच्याकडे फक्त २९ हजार रुपयांची संपत्ती

मेहराज मलिक हे डोडा भागातील लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी लोकांमध्ये जाऊन काही वर्षांतच भक्कम आधार निर्माण केला. 2021 मध्ये त्यांनी डीडीसी निवडणुकीत विजय मिळवला. मार्च 2022 मध्ये डोडा भागात एक भव्य रॅली आयोजित केल्यावर मलिक पहिल्यांदा प्रकाशझोतात आले. त्यांनी निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी २९ हजार रुपयांची संपत्ती आणि दोन लाख रुपयांची देणी जाहीर केली आहेत. ते पदव्युत्तर पदवीधर आहेत. त्याच्यावर गुन्हेही दाखल आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article