राज्यातील राजकारणात प्रियांका गांधी यांची इंट्री:विकासाच्या नावाखाली पायाभूत सुविधांमधील बिघाडांवर साधला निशाणा

5 hours ago 1
काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी-वाड्रा यांनी महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीवर आरोप केले आहेत. विकासाच्या नावाखाली राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या छताचा काही भाग मुसळधार पावसात कोसळल्याचे नुकत्याच घडलेल्या घटनेसह अनेक पायाभूत सुविधांमधील बिघाडांवर त्यांनी टीका केली आहे. या संदर्भात त्यांनी एक पोस्टमधून केलेल्या टीकेमुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्ट्रीने ही राज्यातील राजकारणात प्रियांका गांधी यांची इंट्री मानली जात आहे. रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या घटनेव्यतिरिक्त, प्रियांका गांधी-वाड्रा यांनी महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष आणि गैरव्यवस्थापनाच्या इतर चिंताजनक घटनांकडेही लक्ष वेधले आहे. या संदर्भात त्या म्हणाल्या की, मुंबई-नाशिक महामार्ग पूर्णपणे कार्यान्वित नसूनही 500 हून अधिक खड्डे पडले आहेत. याशिवाय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणानंतर लगेचच कोसळल्याच्या घटनेचाही त्यांनी उल्लेख केला. प्रियांका गांधी-वाड्रा यांनी केलेली पोस्ट देखील पहा.... या संदर्भात प्रियांका यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, 'महाराष्ट्रातील रत्नागिरी स्थानकाचे छत उद्घाटनापूर्वीच कोसळले. दुसरीकडे, मुंबई-नाशिक महामार्ग, जो अद्याप पूर्णत: तयारही झाला नव्हता, त्यात 500 हून अधिक खड्डे पडले आहेत. यापूर्वी सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उद्घाटनानंतर काही महिन्यांतच कोसळला होता. मुंबईत 18 हजार कोटी रुपये खर्चून बांधलेल्या अटल सेतूला जोडणाऱ्या रस्त्याला खड्डे पडले आहेत. महाराष्ट्रात ‘फसवणूक आणि फसव्या’ सरकारने विकासाच्या नावाखाली जनतेची फसवणूक करून अगणित भ्रष्टाचार केला आहे. महाराष्ट्रातील जनता लवकरच हिशोब करणार आहे.' राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा.... महाविकास आघाडीच्या 190 जागा फायनल; 98 जागांवरून चर्चेचा खल:दोन दिवसांत अंतिम निर्णय; दसऱ्यापर्यंत जागावाटप हरियाणा, जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते. या पार्श्वभूमीवर महायुती-महाविकास आघाडीच्या जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात आली आहे. मविआच्या नेत्यांची सोमवारपासून तीन दिवस अंतिम चर्चेची बैठक मुंबईत सुरू झाली आहे. 288 पैकी 190 जागांच्या जागावाटपावर आघाडीत एकमत झाले असून उर्वरित 98 जागांबाबत या तीन दिवसांत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती बैठकीला उपस्थित सूत्रांनी दिली. पूर्ण बातमी वाचा... ओबीसी आरक्षण संपवण्याचा आजी-माजी मुख्यमंत्र्यांचा कट:लक्ष्मण हाके यांचा दावा; तर जरांगे स्वतःची गादी निर्माण करत असल्याचा आरोप ओबीसी समाजाचे आरक्षण संपवण्याचा कट महाराष्ट्रात रचला गेला आहे. आणि या कटामध्ये महाराष्ट्रातले आजी आणि माजी मुख्यमंत्री सामील असल्याचा दावा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केला आहे. आरक्षण बचाव यात्रेनिमित्त लक्ष्मण हाके नांदेड येथे दाखल झाले आहेत. या निमित्ताने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हा आरोप केला आहे. लक्ष्मण हाके यांची सभा देगलूर ते देखील होणार आहे. पूर्ण बातमी वाचा.... नागपूरमध्ये महायुतीत वादाची ठिणगी:'एकला चलो'च्या धोरणाची तक्रार श्रेष्ठींकडे करणार, अजित पवारांचे पदाधिकारी आक्रमक नागपूर मधील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये भाजप विषयाची नाराजी चांगलीच वाढली आहे. या संदर्भात स्थानिक पदाधिकाऱ्यांची एक विशेष बैठक नागपुरात पार पडली. या बैठकीत भाजपच्या 'एकला चलो'च्या धोरणाची तक्रार पक्ष श्रेष्ठींकडे करणार असल्याचे ठरवण्यात आले. आमचा पक्ष हा भाजपच्या दावणीला बांधलेला नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी भाजपवर पलटवार देखील केला आहे. यामुळे आता नागपूर मध्ये महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली असल्याचे बोलले जात आहे. पूर्ण बातमी वाचा.... महाराष्ट्र सरकारचे तोंड झाकले तर पाय उघडे पडतात:या सरकारने राज्य दिवाळखोरीत काढले असल्याचा अंबादास दानवेंचा आरोप इलेक्शन जुमल्यांवर पैसे खर्च करत सुटलेल्या महाराष्ट्र सरकारचे आता तोंड झाकले तर पाय उघडे पडत असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आहे. राज्यातील कंत्राटदारांची बिले थकल्यामुळे त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या संदर्भात अंबादास दानवे यांनी सरकारवर निशाणा साधला. या सरकारने राज्य दिवाळखोरीत काढले असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. पूर्ण बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article