सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती:उपाचारादरम्यान दोन महिलांचा मृत्यू; 5 जणांची प्रकृती गंभीर

5 hours ago 1
सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील शाळगावमधील एमआडीसीमधील म्यानमार केमिकल कंपनीमधून मोठ्या प्रमाणावर वायूगळती झाल्याची माहिती समोर आली आहे. यात उपचारादरम्यान दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. या विषारी वायूमुळे अनेक लोक गंभीर झाले असून यातील 5 लोकांना कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. काल (21 नोव्हेंबर) सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घटना घडली. यामध्ये गंभीर प्रकृती असणाऱ्या दोन महिला सुचिता उथळे अन् नीलम रेठरेकर यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये 5 जणांवर आयसीयूत उपचार सुरू आहेत. नेमके काय घडले? विषारी वायू एमआयडीसी परिसर आणि शेजारच्या वस्तीवर पसरला. यामुळे श्वास घेताना अडचण, डोळ्यात जळजळ आणि उलट्या होऊन गंभीर त्रास होऊ लागला. परिसरातील लोकांत घबराट पसरली आणि लोक जीव मुठीत घेऊन धावू लागले. घटनेची माहिती मिळताच माजी आमदार देशमुख, कडेगावचे तहसीलदारांसह पोलिस निरीक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर संबंधित अधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या. गळती झालेला वायू कोणता होता, याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. यासंदर्भात तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला आहे. वायुगळतीमुळे बोंबाळेवाडी, रायगाव आणि शाळगाव परिसरातील नागरिकांना त्रास झाल्याचे समजते. नागरिकांनी दक्षतेचा उपाय म्हणून मास्कचा वापर केला. या दुर्घटनेमुळे बोंबाळेवाडी, शाळगाव व रायगाव येथील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या दुर्घटनेची चौकशीची होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article