सांगली : घाबरू नका...‘जीबीएस’ नवीन नाही, दक्ष राहा

3 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

31 Jan 2025, 1:46 am

Updated on

31 Jan 2025, 1:46 am

सांगली ः जिल्ह्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे (जीबीएस) रुग्ण पहिल्यांदाच सापडलेत असे नाही. यापूर्वीही काहींना या आजाराचे निदान झाले आहे. निदान झालेल्यांपैकी गेल्या तीन वर्षात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये, पण योग्य ती काळजी घ्यावी, लक्षणे दिसल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना केले.

डॉ. वाघ म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात ‘जीबीएस’चे रुग्ण सापडत आहेत. जिल्ह्यात सध्या या आजाराचे सहा संशयित रुग्ण आहेत. त्यातील पाच जणांची प्रकृती ठणठणीत आहे. एक रुग्ण आयसीयूमध्ये आहे. त्याच्याही तब्येतीत सुधारणा होत आहे. हा आजार आपल्यासाठी नवीन नाही. इतर व्हायरलप्रमाणेच हाही एक व्हायरल आजार आहे. दरवर्षी सरासरी 10 ते 20 रुग्णांना या आजाराचे निदान होते. ज्या पद्धतीने चिकुनगुन्याची लागण झाल्यानंतर अचानक स्नायू दुखतात, अखडतात, त्याच पद्धतीने ‘जीबीएस’ची लागण झाल्यानंतर अचानक लुळेपणा येतो. मात्र वेळेत उपचार झाल्यास हा आजार पूर्णपणे बरा होतो. निदान झालेल्या रुग्णांपैकी 95 ते 97 टक्के रुग्ण पूर्णपणे बरे होतात. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. लक्षणे दिसली आणि त्याकडे दुर्लक्ष केल्यास मात्र मृत्यू होण्याची दोन टक्के शक्यता आहे.

जीबीएसचे निदान होण्यासाठी काही चाचण्या केल्या जातात. लक्षणांनुसार निदान आणि उपचार केले जातात. रुग्णाच्या रोगप्रतिकारक शक्तीनुसार हा आजार काही दिवसांत पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे कोणीही घाबरू नये. मात्र लक्षणे दिसल्यास आरोग्य विभागाच्या यंत्रणेशी संपर्क साधावा. गेल्या तीन वर्षात जिल्ह्यात ‘जीबीएस’चे 53 संशयित रुग्ण होते. त्यातील 31 जणांचे निदान झाले. सर्वंच्या सर्व रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा या आजाराचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहे, असे डॉ. वाघ म्हणाले.

गुइलेन बॅरे सिंड्रोम ही एक दुर्मीळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. ज्यामध्ये तुमची रोगप्रतिकारक शक्ती मज्जासंस्थेवर हल्ला करते. यामुळे शरीरात अचानक तीव्र बधीरपणा, मुंग्या येणे, स्नायू कमकुवत होणे, अचानक हाता-पायांतली ताकद नष्ट होणे, यासारखी लक्षणे दिसू शकतात. वेळेवर निदान आणि उपचार अतिशय गरजेचे आहेत. उपचारानंतर बहुतेक लोक अगदी गंभीर ‘जीबीएस’मधूनसुद्धा पूर्णपणे बरे होतात. या आजाराची नेमकी कारणे माहीत नसली तरी जीबीएस झालेल्या 3 पैकी 2 लोकांना काही आठवड्यांपूर्वी अतिसार किंवा श्वसनाचे आजार झालेले आढळतात.

पिण्याचे पाणी दूषित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. पाणी उकळून घ्यावे, अन्न स्वच्छ आणि ताजे असावे, वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा, शिजलेले अन्न आणि न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article