सांगळूदकर महाविद्यालयात सायबर सुरक्षा जाणीव जागृती कार्यशाळा:वुमन्स स्टडी सेंटर व वुमन डेव्हलपमेंट सेलच्या वतीने संयुक्त आयोजन

3 days ago 3
जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील वुमन्स स्टडी सेंटर व वुमन डेव्हलपमेंट सेल यांच्या संयुक्त सहकार्याने नुकतेच सायबर सुरक्षा जाणीव जागृतीबाबत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत दर्यापूर तालुक्यातील इतर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. प्रथम सत्राचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल बोडखे यांनी सायबर विषयाच्या अनेक बाबींवर सविस्तर प्रकाश टाकला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या डॉ. वैशाली गुडधे यांनी प्रामुख्याने विद्यार्थिनींच्या बाबतीत अनेक प्रकारे फसवणूक कशी घडते व याबाबत सतर्कतेची भूमिका कशी घ्यायची यावर मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी मुलींच्या उच्च शिक्षणासाठी राबवण्यात येत असलेल्या शासनाच्या योजनांविषयी देखील माहिती दिली. द्वितीय सत्रात प्रमुख वक्ते म्हणून सायबर तज्ज्ञ डॉ. ममेश माथनकर यांनी मोबाइल, इंटरनेट, फोन पेच्या माध्यमातून अशिक्षित माणसापासून ते आयएएस अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना याची झळ कशी लागली हे सांगताना सायबरचे अनेक प्रकार त्यांनी समजावून सांगितले. या वेळी सायबर सुरक्षा जाणीव जागृती संदर्भात पूर्व चाचणी व उत्तर चाचणी दहा मिनिटे तथा विषय तज्ज्ञांच्या मांडणीनंतर खुली चर्चा घेण्यात झाली. कार्यशाळेबद्दल काही विद्यार्थिनींनी मनोगतही व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. वृषाली देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पुष्पा दहीकर यांनी केले, तर आभार प्रा. वैशाली चौरपगार यांनी मानले. स्वागत गीत संगीत विभागाने सादर केले. संपूर्ण कार्यक्रमाकरिता प्रा. डॉ. नंदकिशोर गोपकर, प्रा. डॉ. सुशील चरपे व प्रा. डॉ. नीलेश किसवे यांनी सहकार्य केले. आयक्यूएसी समन्वयक प्रा. मनीष होले तथा महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी या वेळी बहुसंख्येने उपस्थित होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article