Published on
:
29 Nov 2024, 1:15 am
Updated on
:
29 Nov 2024, 1:15 am
देवरुख ः देवरुख-संगमेश्वर मार्गावरील साडवली साईनगर येथे बुधवारी सायंकाळी 7.30 वा. दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात कांजिवरा येथील दुचाकीस्वार नवीद युनूस कापडी (वय 35) याचा मृत्यू झाला.
नवीद हा दुचाकीने देवरुखहून साडवलीच्या दिशेने जात होता. यावेळी साडवली साईनगर येथे अचानक गाय आडवी आल्याने दुचाकीवरील त्याचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्याला तत्काळ जवळच असलेल्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यला मृत घोषित केले. नवीद हा हरहुन्नरी तरुण होता.
टेम्पो चालवून प्रामाणिकपणे तो व्यवसाय करत होता. मात्र, त्याच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. शवविच्छेदन देवरुख ग्रामीण रुग्णालयात करुन मृतदेह रात्री नातेवाईक यांच्या ताब्यात देण्यात आले. गुरुवारी सकाळी नवीदच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक व राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्याचा पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.
नवीद हा देवरुखातील शिवसेना ठाकरे गटाचे कट्टर कार्यकर्ते इस्तियाक कापडी यांचे लहान बंधू होत.