सायबर धोके, फिशिंग, हॅकिंगबाबत केली जागृती:कुरुलच्या न्यू इंग्लिश‎स्कूलमध्ये मार्गदर्शन‎

3 days ago 2
सायबर सुरक्षेच्या तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना विविध सायबर धोके कसे ओळखावे? पासवर्ड सुरक्षितता, सोशल मीडिया वापरताना घ्यायची काळजी? फिशिंग आणि हॅकिंगसारख्या धोरणांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. याबरोबरच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. कुरुल (ता. मोहोळ) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सायबर सुरक्षा या विषयावर एक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संगणकशास्त्र संकुल क्विक हिल फाउंडेशन यांच्या विद्यमाने सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा हा उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये इंटरनेट वापराच्या सुरक्षित पद्धती, ऑनलाइन धोके, तसेच त्यांच्यापासून संरक्षण कसे करावे? याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोजन केले होते. तृप्ती पवार व तेजश्री पवार यांनी विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या जबाबदारीने वापराचे महत्त्व पटवून देत सायबर सुरक्षेचे नियम पाळण्याचे आवाहन केले. आधुनिक काळात इंटरनेट वापर अटळ आहे. परंतु त्या सोबत येणारे धोके ओळखून सुरक्षित राहणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांसह शिक्षकवर्ग व पालकांचीही मोठी उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेची शपथ देण्यात आली. मुख्याध्यापक जे. पी. मदने यांनी मार्गदर्शन केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article