नळातून दुषित पाण्याबरोबर मृत मासे आल्याचा प्रकार शिरोडा येथील घडला
Published on
:
06 Feb 2025, 6:03 pm
Updated on
:
06 Feb 2025, 6:03 pm
वेंगुर्ले : शिरोडा ग्रामपंचायतकडून नळ योजना सुरू करण्यात आली आहे. वारंवार पाईपलाईन फुटत असल्याने या नळातून अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. असे असताना आता दुर्गंधीयुक्त पाण्याबरोबर मृत मासे येत असल्याचा प्रकार समोर आल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
नळातून गढूळ पाण्याबरोबर चिखलातील मासे वाहून येत असल्याने पाण्याला प्रचंड दुर्गंध येत आहे. काही ठिकाणी मेलेले मासे अडकून पाईप लाईन बंद झालेली आहे. ग्रामपंचायत कर्मचारी यासाठी खूप मेहनत घेत असले तरी शिरोडा ग्रामपंचायतकडून कोणतीच कार्यवाई केली जात नसल्याने प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करत आहे का ? असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. तिलारी पाणी योजना मंजूर असूनही ही योजना सुरू करण्याबाबत ग्रामपंचायत सकारात्मक दिसत नसल्याने लोकांनी करावे तरी काय? असा प्रश्न नागरिकांमधून केला जात आहे.