स्पर्धात्मक उपक्रमातून खेळ, शारीरिक आरोग्याविषयी जनजागृती होणे गरजेचे:सातारा हिल मॅरेथॉन विजेत्यांचा गौरव, प्रियदर्शनीचा उपक्रम कौतुकास्पद- ठोंबरे

4 days ago 3
बार्शी रनर्स तसेच सायकलिंग क्लब बार्शी शहरात विविध स्पर्धात्मक उपक्रमातून खेळ व शारिरीक आरोग्याबाबत जागृती निर्माण करत आहेत. या दोन्ही क्लबमधील सदस्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवला आहे हे ऐकून मी प्रभावित झाले. याचा निश्चितच अभिमान आहे. खेळ व उत्तम शारिरीक आरोग्याच्या दृष्टीकोनातून जाणीव जागृती करण्याचा उद्देशाने, प्रेरणा देण्याचा प्रियदर्शनी ग्रुपचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन बार्शी कन्या व भारताची स्टार टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे यांनी केले. बार्शीतील कापडविश्वातील अग्रगण्य नांव असलेले प्रियदर्शनी ग्रुपच्यावतीने सातारा हिल मॅरेथॉन फिनिशर्सचा गौरव सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे म्हणाले, बार्शी रनर्स व सायकलिंग क्लबच्या उपक्रमामुळे जाणीव जागृती वाढून शहरवासियांना यातून प्रेरणा मिळेल असे सांगितले.यावेळी तुळजापूरचे गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी व्यायामाच्या निमीत्ताने बार्शीतील सर्व स्पोटर्समनचा लळा लागला. त्यामुळे आपण नगरला मिळालेली संधी देखील नाकारल्याचे सांगितले. बार्शी सायकलिंग व बार्शी रनर्सचे मार्गदर्शक सुधीर खाडे यांनी दोन्ही क्लबच्या स्थापनेपासून आजपर्यंतची वाटचाल सांगितली. प्रास्ताविकात निलेश सरवदे म्हणाले, आजच्या काळात मुले-मुली मैदानी खेळापासून दूर होवून मोबाईलशी मैत्री करत आहेत. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. आपल्यापासून प्रेरणा घेवून मुलामुलींनी क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले. प्रियदर्शनी ग्रुप फक्त व्यवसाय करत नसून सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून रोटरी, लायन्स, मातृभूमी, बार्शी सायकलिंग व रनर्स क्लब यांच्या सोबत राहून विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमात सहभागी असतो. त्याचाच भाग म्हणून या उपक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले. यावेळी व्यासपीठावर चंद्रकांत बारबोले, निखील सरवदे आदी उपस्थित होते. शिल्पा सरवदे यांनी ठोंबरे यांचा सत्कार केला. सिध्दी सरवदे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. यावेळी सई सरवदे उपस्थित होत्या. यांचा झाला गौरव सातारा हिल चॅम्पियन महावीर कदम, अजित मिरगणे यांच्यासह सातारा हिल विजेते माणिक हजारे, अमृत खेडकर, सुधीर खाडे, प्रशांत चाकवते, प्रविण काळेल, सचिन जगताप, ज्ञानेश्वर खुने, प्रकाश फुरडे, विजय क्षीरसागर, रणजीत पाटील, अमोल ताकभाते, डॉ.नवदीप लोकरे, समाधान कोकाटे, तसेच हिल चॅलेंजर्स डॉ.कुमार जगताप, प्रविण तुपे, दीपक कुणके, डॉ.दीपक जगताप, बाळासाहेब ढेंबरे, श्रीकांत नान्नजकर, मंगेश बिडवे, अॅड वासुदेव ढगे, रवीप्रकाश बजाज, सतीश कोळी, डॉ.अतुल कुंभारे या सर्वांचा श्रीगणेशाची प्रतिमा देवून मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article