स्वत:तील उपजत गुण ओळखून जीवनाकडे सकारात्मकतेने पाहा:अनामप्रेम संस्थेचे अध्यक्ष इंजि.अजित माने यांचे प्रतिपादन

6 hours ago 1
अंध व्यक्तीच्या आयुष्यात 'पांढरी काठी' ही तिसरा डोळा म्हणून काम करते. अंध व्यक्तिने स्वतःला कमजोर न समजता आपल्यातले उपजत गुण ओळखून जीवनाकडे सकारात्मकतेने पाहावे व जीवनात यशस्वी व्हावे सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीमागे अनामप्रेम संस्था उभी राहील, असे प्रतिपादन अनामप्रेम संस्थेचे अध्यक्ष इंजि.अजित माने यांनी केले. अनामप्रेम संस्थेतर्फे 'जागतिक पांढरी काठी' दिवस साजरा करण्यात आला. यावेळी माने बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धावपटू अजय धोपावकर उपस्थित होते. माने म्हणाले अंध विद्यार्थी जिद्द चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर विविध क्षेत्रात समजदार कामगिरी करीत आहे. त्यांनी नियमितपणे अभ्यास करून आपल्या क्षेत्रात यशस्वी व्हावे, अनामप्रेम संस्था त्यांना मदत करेल. अजय धोपावकर म्हणाले मला वयाच्या ४४ व्या वर्षी अचानक अंधत्व आले. या संकटावर मात करण्यासाठी अनामप्रेम संस्थेचा मोठा आधार मिळाला. त्यामुळे पुढे अंध असतानाही १५ मॅरेथॉन मध्ये सहभाग घेऊ शकलो. माझ्या जीवनात पांढऱ्या काठी मुळे दिशा व परिवर्तन होण्यास मदत झाली. अनामप्रेम चे विद्यार्थी शुभम राऊत व द्वारका जोरवर यांची यावेळी भाषणे झाली. सूत्रसंचालन वसतिगृह प्रमुख अमृत भुसारी यांनी, तर आभार चेतन लांडगे यांनी मानले. अनामप्रेम संस्थेचे अभय रायकवाड, राहुल खिरोडे, प्रकाश गजे, पल्लवी मकासरे आदी उपस्थित होते पडद्याच्या आजाराने अंधत्व आलेलेही नेत्रदान करू शकतात डोळ्याच्या पडद्याच्या या आजाराने व रात आंधळेपणाने अनेक जण अंध होतात. परंतु असे अंध नेत्रदान करू शकतात. बुबळाच्या विकाराने अंध झालेल्या ना नेत्रदानाची गरज असते. पडद्याच्या व रात आंधळेपणाच्या आजाराने अंध झालेल्या रुग्णांनीही व डोळसांनी नेत्रदान करावे, असे आवाहन अजय धोपावकर यांनी केले. मला पडद्याच्या आजाराने अंधत्व आलेला आहे. त्यामुळे मी देखील नेत्रदान करू शकतो, तसा संकल्प मी केला आहे, असे ते म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article