हजारो महिलांचा घाटनदेवी तीर्थयात्रेत सहभाग:पुष्पा लहामटे यांच्या प्रतीक्षेत दोन तास ताटकळत बसल्या अकोल्यातील भाविक महिला‎

2 hours ago 1
नवरात्रोत्सवानिमित्त अकोले तालुक्यातील घाटघर येथील ग्रामदैवत घटनदेवी यात्रा चर्चेचा विषय ठरली. ७ ते ११ ऑक्टोबपर्यंत ही यात्रा होणार आहे, असे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या संपर्क कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे. या यात्रेसाठी अकोले तालुक्यातील शेकडो चारचाकी वाहनांची अकोल्यात गर्दी झाली. विधानासभा निवडणुकीनिमित्त घाटघर येथील ग्रामदैवत घाटनदेवी तीर्थ यात्रेवर चार दिवसांपासून खर्च सुरू आहे. तालुक्यातील महिलांचे रहिवास ठिकाणांहून ते अकोले, राजूर, रंधा धबधब्यावरील घोरपडादेवी, वाकी, शेंडी ते घाटघर येथील घाटनदेवी असा सुमारे ५० पासून ते ७० किलोमीटर अंतराची ही यात्रा आहे. या यात्रेला महिलांचा प्रतिसाद मिळत आहे. पण गुरुवारी यात्रेतील महाआरतीला पुष्पा लहामटेच्या प्रतीक्षेत महिलांना दोन तास ताटकळत बसावे लागले. अखेर पावसानेच त्यातून त्यांची सुटका केली. तालुक्यातील गावागावांतून नवरात्रोत्सवानिमित्त हजारो महिलांना घाटनदेवी यात्रा घडवून आणण्याचे काम तालुक्याचे लोकप्रतिनिधींकडून सुरू आहे. ७ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या या घटनदेवी यात्रेचा उद्या ११ ऑक्टोबर रोजी शेवट होईल. दररोजच सुमारे हजार ते दीड हजार महिलांनी या यात्रेत सहभाग घेतल्याचे दिसून येते. गुरुवारी सुमारे दीड हजार महिलांना घेऊन चारचाकी वाहन चालक ठरलेल्या मार्गाने दुपारी २ ते ३ वाजताच घाटघर येथील घाटनदेवीला पोहोचले. तेथे देवीचे दर्शन घेऊन महिलांनी फोटोसेशन केले. परिसरातून फेरफटका मारून पुन्हा स्थानिक मंदिरात जमले. दुपारी ३ वाजल्यानंतर त्या घरी परतण्यासाठी वाहन सुरू होण्याची वाट बघत होत्या. पण ३ वाजल्यानंतर मंदिरात लोकप्रतिनिधीच्या सौभाग्यवती पुष्पा किरण लहामटे यांच्या हस्ते महाआरती करण्यात येणार आहे, असे सांगतानाच तेथे थांबवण्याचे आदेश वाहनचालकांना आले. यामुळे महाआरतीच्या प्रतीक्षेत यात्रेतील महिलांना दोन तास ताटकळत थांबावे लागले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article