हिंगोलीत उत्तरप्रदेशातील तरुणीवर बलात्कार:लग्नाचे अमिष दाखवून कामासाठी आलेल्या तरुणीवर अत्याचार, गुन्हा दाखल

4 days ago 3
हिंगोली शहरात कामाच्या निमित्ताने आलेल्या उत्तर प्रदेशातील एका तरुणीवर अत्याचार करणाऱ्या तरुणा विरुध्द हिंगोली शहर पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 14 पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने पथक रवाना करून तरुणाला कळमनुरी शिवारातून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशातील एक तरुणी तिच्या आई, वडिलांसोबत हिंगोली येथे कामाच्या निमित्ताने आली होती. तिच्या वडिलांनी हिंगोलीत लहान व्यवसाय सुरु केला होता. त्याच बाजूला वैजनाथ श्रृंगारे (रा. रेणापूर, ता. कळमनुरी) यानेही व्यवसाय सुरु केला होता. यावेळी त्याचे कामानिमित्त आलेल्या कुटुंबातील तरुणी सोबत ओळख झाली. या ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले. यावेळी वैजनाथ याने तरुणीला लग्नाचे अमिष दाखविले. त्यानंतर तिच्यावर मागील सात वर्षापासून वेळोवेळी अत्याचार केला. वैजनाथ याने त्या तरुणीला पुणे येथेही नेल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. मात्र मागील काही दिवसांपासून तरुणीने लग्नाचा तगादा लावला असता वैजनाथ याने लग्नास नकार देऊन तरुणीला शिवीगाळ केली. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने आज पहाटे थेट हिंगोली शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी वैजनाथ याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम पेरगेवार, जमादार अशोक धामणे, राहुल जोगे, संतोष करे, धनंजय क्षिरसागर, संजय मार्के यांच्या पथकाने पहाटेच कळमनुरी शिवारात धाव घेऊन वैजनाथ यास ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक परगेवार, जमादार जोगे पुढील तपास करीत आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article