हिंदुंनी जातीभेद विसरून एकत्रित यावे:संघाचे पश्चिम महाराष्ट्र संघचालक नानासाहेब जाधव यांचे आवाहन

5 days ago 4
हिंदूंनी जातीभेद विसरून एक व्हावे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संघ मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदार जागृती अभियान राबवणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र संघचालक नानासाहेब जाधव यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमीच्या एक दिवस अगोदर पथसंचलन करण्यात आले. जामखेड शहरातील नवीन नगरपरिषद कार्यालयापासून संविधान चौक, मेन रोड, जयहिंद चौक, बीड रोड, मिलिंदनगर, तपनेश्वर रोड, खर्डा चौक ते महावीरभवन असे संचलन करण्यात आले. ठिकठिकाणी संचलनाची पाहणी प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांनी पाहणी केली. यानंतर महावीर भवन येथे सांगता कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी साकत येथील साकेश्वर विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रेय काळे यांच्यासह तालुका कार्यवाह बाळासाहेब दळवी, विवेक कुलकर्णी, भगवान मुरूमकर, सोमनाथ पाचारणे, मनोज कुलकर्णी, अमित चिंतामणी, संजय काशीद, शरद कार्ले आदी उपस्थित होते. यावेळी जाधव म्हणाले, संघात विजयादशमी हिंदू साम्राज्य दिन, गुरू पुजन, रक्षाबंधन, मकरसंक्रांत हे उत्सव साजरे केले जातात. विजयादशमीला सीमोल्लंघन म्हणजे अनुकूल बदल करावे लागतात. सामाजिक काम करताना मेहनत करावी. आपल्या देवदेवतांच्या हातात शस्त्र आहे. त्यामुळे आपण शस्त्रांचे पूजन करतो. परंतु आपण एका अर्थाने शस्त्र विसरून चाललो आहे. काळानुरूप शत्रुवर मात करण्यासाठी शस्त्रात बदल करत आहे. आपल्यावर दुसऱ्याने आक्रमक केल्यास सहन करता कामा नये. आज दहशतवाद, आतंकवाद हे असूर आहेत. यावर विजय मिळवला आहे. यासाठी समाजाने पाठिंबा दिला पाहिजे. स्वयंसेवक तयार झाले पाहिजे. समाजात वैचारिक, सामाजिक, धार्मिक या शक्ती काम करत आहेत. त्यांना एकत्र करून परिवर्तन करू शकतो. आज समाजात निवडणुकीत शंभर टक्के मतदान झाले पाहिजे. यासाठी प्रबोधन केले जावे. यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आग्रही आहे, असे जाधव यांनी सांगितले. यावेळी काळे यांनी सांगितले, जात भिन्न रहित देश व्हावा. राष्ट्र हितासाठी सर्वांनी एकत्र येऊन देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article