हिंदुत्वाच्या परीक्षेत उद्धव ठाकरे फेल:मविआमध्ये सर्वाधिक 20 जागा उद्धवसेनेने जिंकल्या, हे पराभवातही समाधान
1 hour ago
1
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेना कुणाची, अस्सल हिंदुत्व कुणाचे, असा प्रश्न गेली अडीच वर्षे विचारला जात होता. त्याचे उत्तर देताना हिंदुत्वाच्या परीक्षेत उद्धव ठाकरे फेल झाले. शिवसेना एकनाथ शिंदेंची यावरही मतदारांनी शिक्कामोर्तब केले. हिंदुत्व आणखी सौम्य करत शरद पवारांच्या सोबत राहतील
महायुतीसोबत जाणे शक्यच नसल्याने काँग्रेस आणि शरद पवारांसोबतच राहतील. आता निवडून आलेल्या आमदारांना राखण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावावी लागेल.
हिंदुत्वाची खिल्ली उडवली, नवा कोणताही मुद्दा नव्हता 1 शिवसेनेचा मूळ पाया असलेला हिंदुत्वाचा मुद्दा अक्षरश: बाजूला ठेवून मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली.
2 आपले हिंदुत्व वेगळे आहे, असे सांगण्यासाठी वारंवार भाजपची खिल्ली उडवण्यावरच भर दिला. अनेकदा खालच्या पातळीवर जाऊनही टीका केली.
3 महायुतीच्या विकासाच्या मुद्द्यावर प्रतिवाद केला नाही. जागावाटपात बोटचेपी भूमिका घेतली. लाडकी बहीण योजनेची खिल्लीही उडवली.
4 एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ५० खोके, बाप-पक्ष पळवला हा मुद्दा लोकसभेत वापरला. मात्र, विधानसभेत या मुद्द्यापलीकडे त्यांना जाता आले नाही.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)