110 जणांनी स्वत: हटवले अतिक्रमणे, नकार देणाऱ्यांचे पक्के बांधकाम पाडले:अतिक्रमणे न होण्यासाठी पालिका व पोलिसांचे कायमस्वरूपी फिरते पथक स्थापणार
3 hours ago
1
तालुका प्रशासनाच्या पुढाकाराने शहरातील विविध महामार्गांवरील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा पडला. किरकोळ कुरबुरी वगळता अतिक्रमणधारकांकडून फारसा विरोध झाला नाही. जिल्हा बँक चौक व आंबेडकर चौकातील अतिक्रमणे काढल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका झाली. शहरातून कल्याण- विशाखापट्टण, बारामती- छत्रपती संभाजीनगर, नवगण राजुरी- शिर्डी असे महामार्ग जातात. या महामार्गाच्या दुतर्फा फेरीवाले, मावा, टपऱ्या, चहाच्या टपऱ्या व विविध व्यावसायिकांमुळे अवजड वाहनांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. जिल्हा बँकेला अतिक्रमणांचा वेढा पडल्याने ग्राहकांना बँकेची चौकशी करावी लागत होती. बंदी असूनही विनापरवाना फ्लेक्समुळे दुकाने झाकली गेली होती. याबाबत व्यापाऱ्यांनी आमदार मोनिका राजळे व लोकप्रतिनिधींकडे अतिक्रमणे हटवण्याची विनंती केली होती. काही अतिक्रमणधारकांनी टपऱ्या भाड्याने देत व्यवसाय सुरू केला होता. शेवगाव रस्त्यावर एका टपरीच्या तीन टपऱ्या करून वसुली सुरू होती. जुन्या बसस्थानकामध्ये काही टपऱ्यांमधून अवैध धंदे सुरू होते. बाजारतळ, संस्कार भवन परिसर चौक, माणिकदौंडी रस्त्यावर अनेक अतिक्रमणे झाली होती. यंदाच्या मोहिमेत प्रथमच मांस विक्री करणारी दुकाने हटवण्यात आली. मेन रोड, नवी पेठ भागात अतिक्रमणांमध्ये ओटे बांधून व्यापाऱ्यांकडून सामान ठेवले जाते. काही फुलविक्रेते पलंगाची पथारी मांडून रस्ता अडवतात. दुकानाबाहेर ठेवलेल्या सामानाला वाहनचालकांकडून धक्का लागल्यास व्यापारी हमरीतुमरीवर येतात. आजच्या मोहिमेमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता वसंत बडे, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, पालिकेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे, स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय ढवळे व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. सर्व अतिक्रमणे हटेपर्यंत मोहीम सुरू राहणार असून, पुन्हा अतिक्रमणे होऊ नये, म्हणून पालिकेचे व पोलिसांचे फिरते पथक स्थापण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विविध शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात शाळकरी मुलींची छेडछाड रोखण्यासाठी पोलिसांनी संस्थाचालकांकडून पत्र घेण्याचे ठरवले आहे. सायंकाळी चार वाजेपर्यंत ११० हून अधिक अतिक्रमणे व्यावसायिकांनी स्वतः काढून घेतली. काहींनी नकार दिल्याने पक्के बांधकाम पाडण्यात आले. समर्थ मेडिकल चौकापासून नवीन बसस्थानकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने भीषण परिस्थिती आहे. व्यावसायिकांना बाह्यवळणाची धास्ती राष्ट्रीय महामार्ग विभागाने शहरात अवजड वाहनांसह मोठ्या वाहनांना अडथळा होत असल्याने बाह्यवळण रस्ता प्रस्तावित करून मंजुरीसाठी पाठवला आहे. त्याची अंमलबजावणी झाल्यास पाथर्डी शहर निव्वळ फिरण्याचे मैदान होईल. सर्व वाहतूक बाहेरून जाण्याची भीती व्यावसायिकांना वाटते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी समन्वय ठेवत अतिक्रमणे होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. तसे झाल्यास शहराचे विद्रूपीकरण थांबणार असल्याचे मत व्यावसायिकांनी व्यक्त केले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)