20KM कापण्यासाठी 80KM चा प्रवास:बोपदेव घाट गँगरेपच्या आरोपींची हुशारी, पण तरीही पोलिसांनी मुसक्या आवळल्याच

2 hours ago 1
पुण्यातील बोपदेव घाटातील सामूहिक अत्याचारातील 3 आरोपींना अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. या आरोपींनी गँगरेपनंतर मोठ्या शिताफीने आपला गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला. पण गुप्हेरांनी दिलेल्या टीपच्या आधारावर पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर झालेल्या चौकशीत या आरोपींनी पोलिसांना चकवा देण्यासाठी काय - काय केले याची विस्तृत माहिती दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, तिन्ही आरोपी शेजारच्या मध्य प्रदेशातील आहेत. ते गत काही वर्षांपासून पुणे व परिसरात कचरा वेचण्यासह इतर छोटी-मोठी कामे करतात. पण त्यांचा मुख्य कल हा चोरी करण्याकडे होता. बोपदेव घाटात तरुणीवर बलात्कार केल्यानंतर आरोपींनी पोलिसांना चकवा देण्यासाठी 20 किमीचे अंतर कापण्यासाठी तब्बल 81 किलोमीटरचा प्रवास केला. बिअर प्राशन करून, गँगरेप केला बोपदेव घाट परिसरात गत 3 ऑक्टोबर रोजी तिन्ही आरोपींनी आपल्या मित्रासोबत फिरण्यास आलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. तत्पूर्वी, रात्री 8.30 च्या सुमारास या आरोपींनी बोपदेव घाटाच्या पायथ्याशी असलेल्या येवलेवाडी येथील एका बिअर शॉपीमधून बिअर विकत घेतली. ती त्यांनी प्राशन केली. त्यानंतर तिघेही रात्री 10.30 च्या सुमारास ते घाटातून सपाटीच्या दिशेने निघाले. त्यांना पीडित तरुणी व तिचा मित्र दिसले. त्यांनी त्या दोघांना धमकावले. त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू घेतल्या. तसेच पीडितेवर गँगरेप केला. दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत फिरत राहिले तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिन्ही आरोपी पुन्हा घाटाच्या वरच्या बाजूला गेले. त्यानंतर दुसऱ्या मार्गाने ते घाट उतरले. तसेच वेगवेगळ्या मार्गांनी खेड शिवापूरला गेले. टोलनाक्यावरून त्यांनी आणखी वेगळा मार्ग निवडला. 4 ऑक्टोबर पहाटेपर्यंत ते फिरत राहिले. या कालावधीत त्यांनी कुठेही मोबाईलचा वापर केला नाही. दिवस उजाडल्यानंतर तिघेही वेगवेगळे झाले. दुसरीकडे, या घटनेनंतर पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकली होती. त्यांनी आरोपींच्या शोधासाठी तब्बल 60 पोलिस पथके तयार केली होती. पण आरोपींचा माग लागत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचाही वापर केला. तसेच 700 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. पण आरोपींचा कोणताही सुगावा लागत नव्हता. एका व्यक्तीच्या माहितीनुसार स्केच तयार केले अखेर एका व्यक्तीने एका दुचाकीवरून फिरणाऱ्या तिघांचे वर्णन पोलिसांना सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी आरोपींचे स्केच व सीसीटीव्ही आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने ते पडताळून पाहिले. त्यात त्यांना यश आले आणि त्यांच्या तपासाला गती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. त्यानंतर आता पुण्याजवळील ग्रामीण भागातून एका आरोपीला अटक केली. त्यानंतर त्याच्या चौकशीतून या गुन्ह्याचा उलगडा झाला. दरम्यान, या गुन्ह्याची उकल केल्याबद्दल 10 लाख रुपयांचे बक्षीस पुणे गुन्हे शाखा व कोंढवा पोलिस यांना विभागून देण्यात येणार आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article