26/11 Mumbai Attack: 10 दहशतवादी, ताबडतोब फायरिंग, 60 तासांची दहशत अन् 166 लोकांचा मृत्यू; त्या काळ्या दिवसाची कहाणी

2 hours ago 1

दहशतवाद्यांमध्ये अजमल कसाबचाही समावेश होता. त्याला सुरक्षा दलांनी जिवंत पकडलं आणि त्याला फाशी देण्यात आली. एनएसजी कमांडोंना पाचारण करण्यात आलं होतं. त्यांनी सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यांच्या शौर्यामुळे भारतावर आलेलं हे संकट टळलं.

| Updated on: Nov 26, 2024 | 12:08 PM

एकीकडे 26 नोव्हेंबर हा 'संविधान दिवस' म्हणून ओळखला जातो, तर दुसरीकडे या तारखेशी निगडीत एक असा काळा दिवस आहे, जो क्वचितच कोणी विसरू शकेल. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या घटनेला 16 वर्षं उलटली तरी प्रत्येक भारतीयाच्या मनात घटनेच्या कटू आठवणी जिवंत आहेत.

1 / 7

या दहशतवादी हल्ल्यात 18 सुरक्षा कर्मचाऱ्यांसह 166 लोकांनी आपले प्राण गमावले होते. तर 300 हून अधिक लोक जखमी झाले होते. देशातील सर्वांत  सुरक्षित ठिकाणांपैकी एक असलेल्या मुंबईतील ताज हॉटेलला दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं होतं.

2 / 7

पाकिस्तानातील कराची इथून 10 दहशतवादी बोटीने मुंबईला रवाना झाले होते. समुद्रमार्गेच ते मुंबईत दाखल झाले होते. भारतीय नौदलाला चकवा देण्यासाठी त्यांनी वाटेत एका भारतीय बोटीचं अपहरण केलं होतं. त्या बोटीवरील सर्व लोकांना त्यांनी ठार केलं होतं.

3 / 7

या बोटीचा वापर करून ते रात्री आठच्या सुमारास कुलाब्याजवळील मच्छी मार्केटमध्ये उतरले. त्यावेळी स्थानिक मच्छिमारांनाही त्यांच्यावर संशय आला होता. याबाबत पोलिसांना कळवलं असता त्यांनी सुरुवातीला त्याकडे गांभीर्याने पाहिलं नव्हतं.

4 / 7

लष्कर-ए-तैयबाच्या सशस्त्र दहा दहशतवाद्यांनी मुंबईतील अनेक ठिकाणी आणि प्रतिष्ठित इमारतींवर हल्ला केला होता. सलग चार दिवस हा हल्ला सुरू होता आणि त्यात 160 हून अधिक लोक मारले गेले. 26 नोव्हेंबर 2008 च्या या घटनेनं संपूर्ण मुंबई हादरली होती.

5 / 7

दहशतवाद्यांनी मुंबईतील दोन फाईव्ह स्टार हॉटेल्स, एक हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन आणि ज्यू सेंटरवर निशाणा साधला होता. 26 नोव्हेंबरच्या रात्री दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्यासह मुंबई पोलिसांच्या अनेक अधिकाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले.

6 / 7

सुरक्षा दलाच्या जवानांना या ऑपरेशनसाठी 60 तासांहून अधिक वेळ लागला होता. लिओपोल्ड कॅफे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून सुरू झालेलं हे मृत्यूचं तांडव ताजमहाल हॉटेलजवळ जाऊन संपलं होतं.

7 / 7

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article